आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपल्या पदाचा राजीनामा देण्यास इच्छुक होते. परंतु, भाजप हायकमानने त्यांना यासाठी मंजुरी दिली नाही. गोव्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी हा दावा केला आहे. सरदेसाई राज्यात सहाय्यक पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आहेत. पर्रिकर यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर आहे. देश-परदेशात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 14 ऑक्टोबर रोजी त्यांना एम्सने डिस्चार्ज दिला होता. याच आठवड्यात काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी पर्रिकर यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला होता.
सरदेसाई गुरुवारी म्हणाले, की पर्रिकर मुख्यमंत्री पद सोडण्यास इच्छुक होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांनी सरकारच्या एका मंत्र्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचे ठरवले होते. आपल्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी ही इच्छा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर व्यक्त केली. परंतु, भाजपने च्या ज्येष्ठ नेत्यांनी यासाठी परवानगी दिली नाही. सरदेसाई यांच्या मते, पर्रिकर यांच्या आजारपणामुळे प्रशासनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यापूर्वी अपक्ष आमदार आणि महसूल मंत्री रोहन खौंते यांनीही पर्रिकरांच्या अनुपस्थितीने सरकारच्या कामकाजावर वाइट परिणाम झाल्याचे म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.