आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parrikars Life At Risk In Rafael Files Alleges Congress In A Letter To The President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Rafale: गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या जीवाला धोका; काँग्रेसने राष्ट्रपतींना पत्र लिहून मागितले संरक्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. गोव्यातील काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडनकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून यासंदर्भातील माहिती दिली. त्यानुसार, रफाल लढाऊ विमानात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित फायलींवरून पर्रिकर यांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे, माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्यासाठी चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी विनंती चोडनकर यांनी केली आहे. गोवा काँग्रेसने एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप जारी करताना त्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात विलंब झाला असा आरोप लावला. या क्लिपमध्ये आरोग्य मंत्री विश्वजीत राणे फोनवर एकाशी संवाद साधत होते. त्यामध्ये, त्यांनी रफालच्या व्यवहारांच्या फायली माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा उल्लेख केला होता.

 

पत्रात आणखी काय?
राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रानुसार, "काँग्रेसला चिंता वाटते की काही लोक फायली मिळवण्यासाठी पर्रिकरांवर हल्ला करू शकतात. रफालच्या कराराशी संबंधित फायली आणि त्यातील खरी माहिती सार्वजनिक होऊ नये अशी त्यांना भीती आहे. कारण, ही माहिती सार्वजनिक झाल्यास सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होईल." चोडनकर यांनी पत्रात पुढे लिहिले, "मी विनंती करतो की मनोहर पर्रिकर यांना सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरवठा करण्यात यावी. त्यांच्या सध्याच्या संरक्षणात वाढही केली जाऊ शकते. जेणेकरून पर्रिकरांना संभावित धोक्यांपासून योग्य संरक्षण मिळू शकेल. तसेच तो निर्भीड आणि निःपक्षपणे देशासमोर फायलींचा खुलासा करू शकतील." काँग्रेसने सांगितल्याप्रमाणे, रफाल डीलशी संबंधित फायलींमुळे पर्रिकरांचा जीव धोक्यात आहे.