आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्यात माजेरहाट पुलाचा भाग कोसळला, एक ठार, ढिगाऱ्याखाली अनेक दबल्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालच्या कोलकातामधील तारातला माजेरहाट पुलाचा भाग  कोसळून अपघात घडला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून,  ढिगाऱ्याखाली काही लोक दबले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मदतकार्य करणारे पथक आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. 

 

#WATCH: Rescue teams and ambulances arrive at the spot where part of Majerhat bridge in South Kolkata has collapsed. #WestBengal pic.twitter.com/5pgpxSgwke

— ANI (@ANI) September 4, 2018

#WATCH: Eye-witnesses react after a part of Majerhat bridge in South Kolkata collapsed. #WestBengal pic.twitter.com/t1du9GDcUM

— ANI (@ANI) September 4, 2018

 

दक्षिण कोलकात्याच्या तारातला परिसरात मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास हा पूल कोसळला. या अपघातात काही वाहने ढिगाऱ्यामध्ये अडकली. सहा लोकांना वाचवण्यात यश आले आहे. लष्कर आणि एनडीआरएफची तीन पथके याठिकाणी मदतकार्य करत आहेत. 

 

पोलिसांकडे रिपोर्ट मागितला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दार्जिलिंगमध्ये आहेत. त्याठिकाणाहून त्या मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठकही घेतली. तसेच पोलिसांना रिपोर्ट देण्यास सांगितला आहे. भाजप नेते मुकूल रॉय म्हणाले की, ममता म्हणतात शहराचे सौंदर्यीकरण केले जात आहे. पण जुन्या बांधकामांच्या दुरुस्तीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांनी अपघाताची जबाबदारी स्वीकारायला हवी. 

 

2016 मध्येही झाला होता अपघात 

उत्तर कोलकात्याच्या गर्दी असलेल्या भागात 31 मार्च 2016 ला निर्माणाधीन विवेकानंद पूल कोसळला होता. या अपघातात 25 जणांनी प्राण गमावले होते. 2009 पासून याचे काम सुरू होते. 

बातम्या आणखी आहेत...