आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कट्टर विरोधक प्रार्थनेसाठी एकत्र; पार्थ पवार - श्रीरंग बारणेंनी तुकोबांना घातले साकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या काळात प्रत्येक उमेदवार देवाकडे विजयासाठी प्रार्थना करताना दिसून येतात. यावेळी आपला विजय व्हावा आणि समोरचा उमेदवार पराभूत व्हावा अशी भावना प्रत्येक उमेदवाराच्या मनात असते. पण दोन विरोधी उमेदवार एकाच मंदिरात दर्शनाला आले तर.... मावळ लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. श्रीरंग बारणे हे मावळचे शिवसेनेचे विद्यामान खासदार आहेत. तर पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून लोकसभा लढविणार आहेत. 


आज तुकाराम बीजनिमित्त देहूमध्ये वारकरी संप्रदायाने मोठी गर्दी केली आहे. आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हा वारकरी संप्रदाय तुकोबाच्या चरणी नतमस्तक होत असतो. पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत यश मिळावे यासाठी तुकोबाच्या दर्शानाला आले होते. योगायोग म्हणजे दोघांनीही तुकोबाकडे सोबतच प्रार्थना केली आहे. आता तुकोबा कोणाच्या पदरी यश पाडणार हे निकालाच्या दिवशी कळेलच.