आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाेबांना पंतप्रधान करायचंय....नातू पार्थ पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पुणे  - मावळ लाेकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आजाेबांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे.  शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे  पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ‘आपल्याला शरद पवार यांना पंतप्रधान करायचे अाहे, कामाला लागा,’ असे आवाहन केले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. ‘तो’ एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो, तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत, असा तर्कही त्यांनी लावला.  

 


पार्थ यांचे पहिले अडखळत केलेेले भाषण साेशल मीडियावर चांगलेच ट्राेल झाले हाेते. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांत ते अगदी माेजकेच शब्द बाेलायचे तेही जपून. मात्र, शनिवारी पुन्हा एकदा त्यांचा ताेेल सुटला व पंतप्रधानांचा एकेरी भाषेत त्यांनी उल्लेख केला.  पुढे ते म्हणाले, ‘गेल्या दहा दिवसांत मला काहीच कळत नाही की, काय चाललंय. कार्यकर्त्यांनी खूप प्रेम दिलं आहे. आता आपल्याकडे केवळ ३५ दिवस राहिले आहेत. आपल्याला सर्वांना एकत्र राहून काम करायचं. खासकरून तरुण वर्गाला आपल्या शहरातील विकास दाखवा, ते संभ्रमित आहेत. मतभेद विसरून जाऊयात. आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे’, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...