आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्पर्धेत भाग घेऊन जिंका 1000 डॉलर्स; जगभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- वर्ल्ड ऑफ सेव्हन बिलियन डॉट ओआरजी या संकेतस्थळाने जगभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ-मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी ‘प्रिझर्व्हिंग बायोडायव्हर्सिटी’, ‘सस्टेनेबल रिसोर्स यूज’ किंवा ‘प्रोटेक्टिंग ह्यूमन राइट्स’ या विषयावर डिजिटल व्हिडिओ बनवून पाठवावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी वैयक्तिक किंवा गट स्वरूपात प्रवेशिका पाठवू शकतात. हा व्हिडिओ ६० सेकंदांचा असावा व त्याच्या सुरुवातीच्या १० सेकंदात टायटल स्क्रीन असावे, ज्यात स्पर्धकाचे नाव व इतर माहितीशिवाय श्रेयनामावली देणे गरजेचे आहे. अंतिम फेरीसाठी निवड झाल्यावर स्पर्धकांकडे व्हिडिओच्या स्राेतांची यादीही असावी. सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नसून, शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१९ ही आहे. विजेत्यांची घोषणा  व यादी ७ मे २०१९ राेजी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. प्रवेशिका इंग्रजीत सबमिट कराव्यात. इतर भाषेतील प्रवेशिकांत इंग्रजी सबटायटल्स असावेत. विजेत्यांना प्रत्येक गटात  प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार दिला जाईल. तिन्ही विषयांत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे १०००, ५०० व २५०, तर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक व रनर अप गटात अनुक्रमे ५०० व २५० डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्या : www.Worldof7Billion.org 

बातम्या आणखी आहेत...