आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Many European Leaders, Parties Have Increased Their Strength By Making An Issue Of Refugee Resistance

निर्वासितविरोधाचा मुद्दा बनवून युरोपातील अनेक नेते, पक्षांनी आपली ताकद वाढवली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्वासितच्या प्रकरणात विविध देशांमधील राजकारण ढवळून निघाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध विदेशींची देशातील घुसखोरी थांबवण्यासाठी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. युरोपमध्येही निर्वासितांचा विरोध राजकीय हत्यार बनला आहे. विदेशींचा विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांची ताकद येथे वाढली आहे. यासंदर्भात टाइमचा रिपोर्ट... 

 

तिजुआना, मेक्सिकोच्या सीमेवर निर्वासितांच्या शिबिरात वायोलेटा मोंटेरोसा उभी राहून सॅन डिएगोमधील महामार्गावर जाणाऱ्या कारना पाहू शकते. नोव्हेंबर २०१८ मध्ये मोंटेरोसोने आपले पती कॅनडिडो कालडेरॉन व तीन मुले केनिया जासमिन (१२), इसाक (११) व यिमी (९) सोबत येथे पोहोचली आणि एका मोठ्या यादीत आपले नाव नोंदवले. त्या यादीत तिच्यापुढे पाच हजारांपेक्षा जास्त निर्वासित अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी वाट पाहत होते. अमेरिकन अधिकारी एका दिवसात केवळ ४० ते १०० अर्ज निकाली काढत होते. त्यामुळे मोंटेरोसा परिवाराचा क्रमांक येण्यासाठी अनेक महिने लागणार होते. तरीही या लोकांपुढे आपला देश ग्वाटेमाला येथे परत जाण्याचा पर्याय नव्हता. 

 

२०१८ मध्ये ५९ हजार निर्वासितांनी अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज दिला आहे. हे २००८ च्या तुलनेत २७४ टक्के जास्त आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील दक्षिण सीमेला राष्ट्रीय संकट जाहीर केले आहे. ते म्हणतात, 'मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे हा त्यांचा निवडणूक अभियानाचा प्रमुख मुद्दा आहे. अवैध विदेशींचा घुसखोरी रोखण्यासाठी हे गरजेचे आहे. या प्रकरणात दीर्घकाळापासून अमेरिकन सरकारचे कामकाज ठप्प राहिले आहे. 

 

मोठ्या प्रमाणावर लोकांचे आगमनाचे चांगले व वाईट परिणाम दिसले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानुसार जागतिक लोकसंख्या ३ टक्के ग्लोबल जीडीपीत शरणार्थींचा वाटा २०१५ मध्ये ९ टक्के राहिला आहे. २०१७ मध्ये त्यांचे उत्पन्न ४८० अब्ज डॉलर होते. त्यानंतर मागील काही काळापासून निर्वासितांचा वाढत्या प्रभावाकडे लोकांचे लक्ष लागले आहे. इटलीत शरणार्थींना आणणाऱ्या जहाजाला आपल्या बंदरांमध्ये प्रवेश घेऊ दिला नाही. हंगेरीने अवैध प्रवाशांची मदत करणाऱ्याविरोधात कायदा तयार केला. चेक रिपब्लिक, स्लोवेनिया, स्वीडन, जर्मनी, फिनलँड, इटली, हंगेरीत शरणार्थींचा विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांची ताकद वाढली. ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटच्या चर्चेदरम्यान निर्वासितांचा मुद्दा महत्त्वाचा राहिला. निर्वासितांच्या मुद्द्यामुळे युरोपीय देशांमध्ये राजकीय स्वरूप बदलले आहे. २०१५-१६ मध्ये येथे मध्य पूर्व व आफ्रिकेतून २० लाख निर्वासित पोहोचले. हे सामी बलाडी, मिरे डार्विच २०१३ मध्ये अलेप्पो, सीरियातून पळून युरोपात पोहोचणाऱ्या पहिल्या निर्वासितांमध्ये सामील आहे. सात वर्षांनंतर आता परिस्थितीत बदल झाला आहे. २०११ ते २०१७ दरम्यान पाच लाख सिरियन जर्मनीत पोहोचले आहेत. 


विदेशी लोकांच्या विरोधात जर्मनीत असंतोष वाढत आहे. मागील वर्षी निवडणुकीत तो दिसून आला. निर्वासित विरोधी पार्टी अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनीला तिप्पट जास्त मते मिळाली. हा निकाल चॉन्सलर अँजेला मर्केल यांच्या निर्वासित समर्थक धोरणाच्या विरोधात समजले जात आहे. युरोपियन युनियेनमध्ये २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जुडिओ क्रिश्चियन कल्चरच्या निर्वासितांच्या विरोध करणाऱ्या धोरणाला मोठा पाठिंबा मिळाला. 


जगभरात २५ कोटींपेक्षा जास्त निर्वासित, ८ वर्षांत तीन कोटींपेक्षा जास्त वाढले 
संयुक्त राष्ट्रसंघानुसार सध्या २५ कोटी ८० लाखांपेक्षा अधिक व्यक्ती आपल्या जन्म झालेल्या देशात राहत नाही. १९८५ नंतर याची संख्या दुप्पट झाली. २०१० नंतर त्यात तीन कोटी ६० लाखांनी वाढ झाली. या लोकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आपला देश सोडला आहे. लाखो लोक चांगला रोजगार, चांगले शिक्षण, वैद्यकीय उपचारासाठी बाहेर पडले. ५६ लाखांपेक्षा जास्त लोक युद्धामुळे सिरियातून बाहेर पडले. १० लाखांपेक्षा जास्त रोहिंग्यांना म्यानमारमधून हाकलण्यात आले. हजारो लोक दक्षिण अमेरिका, आफ्रिकेतून गरिबीमुळे पलायन करतात. 

 

बातम्या आणखी आहेत...