आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतूरचे व्यापारी राजेश नहार यांची गोळ्या घालून हत्या, दोन व्यापाऱ्यांची सुपारी दिल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांची शनिवारी रात्री ११ च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पोखरीजवळ गोळ्या घालून हत्या केली. राजेश नहार शनिवारी रात्री कारने परतूरहून जालन्याकडे येत होते. पोखरीजवळ हल्लेखोरांनी कारवर गोळीबार केला. यात नहार गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिस व जालन्यातील लोकांनी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दोन व्यापाऱ्यांची सुपारी दिल्याचा आरोप

प्रसिद्ध व्यापारी विमलराज सिंघवी यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल नहार यांना अटक झाली होती. याशिवाय जालना येथीलच उद्योजक गौतम मुनोत यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी नहार यांनीच सुपारी दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या दोन्ही प्रकरणात नहार जामिनावर होते.

बातम्या आणखी आहेत...