आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंदू पंचांगानुसार अश्विन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. या एकादशीच्या दिवशी मनोवांच्छित फळ प्राप्तीसाठी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या वर्षी ही एकादशी 9 ऑक्टोबर, बुधवार आहे. धर्म ग्रंथानुसार सर्व पापांचा नाश करणारी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी आणि आरोग्य, सुंदर स्त्री, धन व मित्र देणारी ही एकादशी आहे. येथ जाणून घ्या या व्रताचा विधी... या व्रताचे पालन दशमी तिथी (8 ऑक्टोबर, मंगळवार) पासूनच करावे. दशमी तिथीला सात धान्य म्हणजे गहू, उडीद, मुग, हरभरे, जवस, तांदूळ आणि मसूरच्या डाळीचे सेवन करू नये, कारण या सातही धान्याची एकादशीच्या दिवशी पूजा केली जाते. जेवढे शक्य असेल तेवढे दशमी आणि एकादशीच्या दिवशी कमीत कमी बोलावे. दशमी तिथीला जेवणात तामसिक वस्तूंचे सेवन करू नये आणि पूर्ण ब्रह्मचर्यचे पालन करावे. एकादशी तिथीला सकाळी उठून नं केल्यानंतर संकल्प करावा. संकल्प आपल्या शक्तीनुसार घ्यावा, म्हणजे दिवसातून एकदाच फलाहार किंवा आहार न घेण्याचा. संकल्प केल्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर श्रीविष्णूच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापन करून पूजा करावी. व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत. या व्रताचे समापन एकादशीला होत नाही तर द्वादशीला सकाळी ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा दिल्यांनतर हे व्रत समाप्त होते.
प्राचीन काळी विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक शिकारी राहत होता. तो खूप क्रूर होता. त्याचे संपूर्ण आयुष्य पाप कर्मात गेले. जेव्हा त्याचा अंत जवळ आला तेव्हा तो मृत्युच्या भीतीने महर्षी अंगिराच्या आश्रमात पोहचला. अंगिरा ऋषीला त्याने सांगितले की, ऋषिवर मी आयुष्यभर पाप कर्म केले आहेत, कृपा करून मला एखादा असा उपाय सांगा ज्यामुळे माझ्या पापांचा अंत होईल आणि मला मोक्ष मिळेल. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अंगिरा ऋषींनी त्याला पाशांकुशा एकादशीचे व्रत सांगितले. महर्षी अंगिराने सांगितलेल्या विधीनुसार त्या शिकाऱ्याने एकादशाचे व्रत केले आणि सर्व पापातून मुक्त झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.