आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला आला ह्रदयविकाराचा झटका, आरपीएफ जवानांनी वाचवले प्राण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- येथून 'मध्यप्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसने' गुरुवारी सायंकाळी 5:25 वाजता प्रस्थान करताच, आपल्या कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या अशोक नावाच्या व्यक्तीला ह्रद्यविकाराचा झटका आला. त्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकाने 182 क्रमांकावर फोन करून मदत मागितली. चेन ओढल्यानंतर रेल्वे जवळपास पाचशे मीटर अंतरावर जाऊन थांबली. 

 

रेल्वे अधिकाऱ्यानुसार, ड्यूटी पर तैनात असलेल्या आरपीएफच्या कर्मचारी आर. मीणा यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी रूग्णवाहिकेला पाचारण केले. पण रूग्णवाहिका येईपर्यंत त्यांनी पीडित रूग्णाला सीपीआर दिला. त्यामुळे अशोक यांच्या ह्रदयाचे ठोके सुरू झाले. त्यानंतर रूग्णाला रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.


मदत करणाऱ्यांना मिळणार पुरस्कार
उत्तर रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी सांगितले, कोणताही आजारी व्यक्ती आपातकालीन स्थितीमध्ये 182 या क्रमांकावर फोन करून वैद्यकीय सहाय्यता प्राप्त करू शकतो. रेल्वेद्वारे सीपीआर तंत्रज्ञानाविषयी जागरूकता करण्यासाठी अनेक प्रकाररचे प्रोग्राम राबवण्यात येतात. त्यामुळे सर्व रेल्वेमध्ये सीपीआर तंत्रज्ञानाचे फलक लावण्यात आले आहेत. याची सहाय्यता घेऊन कोणीही पीडित व्यक्तीला सहज सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवू शकतो. तसेच, आरपीएफच्या जवानांनी रूग्णाची मदत केल्यामुळे त्यांना सन्मानित केले जाणार आहे.