आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत अवघ्या 20 रुपयांच्या वादात खून, मदत करणे सोडून Video बनवत होते लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत अवघ्या 20 रुपयांच्या वादावर एका प्रवाशाने ऑटोरिक्शा ड्रायव्हरला चाकूने भोसकून खून केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑटोमध्ये 4 प्रवासी होती. छोट्याशा वादानंतर प्रवाशाने चालकावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेला ड्रायव्हर अर्धा तास रस्त्यावर मदतीसाठी हाका मारत होता. पण, कुणीही त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढे आला नाही. उलट काहींनी त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


संसद मार्ग परिसरातील घटना
ही घटना दिल्लीतील संसद मार्ग परिसरात अर्ध्या रात्री घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिल्लीच्या जामिया नगरमध्ये राहणारा जहांगीर आलमच्या ऑटोमध्ये त्या रात्री 4 जण बसले होते. त्यांनी जहांगीरला खानपूर ते इंडिया चलण्यास सांगितले. त्यानंतर भाड्यावरून ड्रायव्हर आणि प्रवाशांत वाद पेटला. ऑटो जेव्हा संसद मार्ग परिसरात पोहोचला, तेव्हा एका पॅसेंजरने चाकू काढून जहांगीरवर हल्ला केला. हल्ला करून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. तेवढ्यात एका सुरक्षा रक्षकाने एका आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याचीच चौकशी करून इतर दोघांनाही अटक करण्यात आली. तर चौथा आरोपी फरार आहे. 


मदत करणे सोडून व्हिडिओ काढत होते लोक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ला झाल्यानंतर जहांगीर अर्धा तास रोडवर रक्तरंजित अवस्थेत मदतीचे आवाहन करत होता. परंतु, कुणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. उलट तेथे टेहळणी करणारे लोक त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते. त्यापैकी एकानेही वेळेवर जहांगीरची मदत केली असती तर तो आज जिवंत राहिला असता.

बातम्या आणखी आहेत...