आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 च्या स्मृतीदिनी तोंडावर रुमाल बांधत घेतला सेल्फी, व्हाट्सअॅपवर शेअर करत लिहिले, \'टेररिस्ट ऑन फ्लाइट\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - जेट एअरवेजच्या कोलकाता ते मुंबई विमानामधील योग वेदांत पोद्दार नावाच्या एका व्यक्तीला एटीएसने ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती फोनवर विमान उडवून देण्याबाबत काहीतरी बोलत असल्याचे सहप्रवाशाने ऐकले होते. त्याने क्रू मेंबरला याबाबत माहिती दिली. त्यांनी याबाबत सीआयएसएफला कळवले आणि त्यांनी त्वरित या प्रवाशाला ताब्यात घेतले. सध्या कोलकाता पोलिस त्याची चौकशी करत आहेत. 

 

आरोपी म्हणाला - गंमत करत होतो.. 

दरम्यान या व्यक्तीला एटीएसने ताब्यात घेऊन चौकशी केली असता वेगळीच कहाणी समोर आली. आरोपीने चौकशीत सांगितले की, तो मित्रांबरोबर गंमत करत होता. त्यासाठी त्याने रुमाल बांधून सेल्फी घेतला आणि मॅसेज केला. तो दहशतवादी नसून मुंबईला एका इंटरव्ह्यूसाठी जात असल्याचे त्याने सांगितले. या घटनेमुळे फ्लाइट एक तास लेट झाली. पोलिस त्याच्या भूतकाळाविषयी माहिती गोळा करत आहेत. त्याच्या नातेवाईकांनाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. 

 

विमानात एका प्रवाशाने त्याच्या शेजारच्या प्रवाशाचे हे संशयास्पद वर्बोतन पाहिले आणि त्देयाने याबाबत क्ण्यारू मेंबरला माहिती दिली. क्रू मेंबर्सने लगेचच याबाबत कॅप्टनला माहिती दिली. कॅप्टनने लगेचच निर्णय घेत विमान मागे वळवले. एअरपोर्टवर सीआयएसएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. एटीएस या प्रकरणी चौकशी करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...