आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Passenger Plane Crash At Almati Airport, 15 Killed Dozens Injured In Kazakhstan News And Updates

विमानतळावरून उड्डान घेताच इमारतीवर जाऊन धडकले विमान, 15 जणांचा जागीच मृत्यू; 60 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूर सुल्तान - कजाखस्तानच्या अल्माती विमानतळाजळ एक मोठा विमान अपघात घडला आहे. यामध्ये विमानाने उड्डान घेताच जवळच्या इमारतीला धडक दिली. अपघात घडला त्या विमानात 98 जण प्रवास करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 60 जण जखमी आहेत. मीडिया रिपोर्टप्रमाणे, बेक एअर फ्लाइट झेड 92100 विमान अल्माती शहरातून राजधानीच्या दिशेने जाणार होते. परंतु, शुक्रवारी सकाळी 7.22 वाजता टेक-ऑफ करताच विमानावरील ताबा सुटला आणि दुमजली इमारतीवर धडकले.

अपघातानंतरचा व्हिडिओ आला समोर

या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये ढिगाराखाली 8 चिमुकल्यांना बाहेर काढताना आणि एक महिला मदतीसाठी रुग्णवाहिकेची मागणी करताना दिसून आली आहे. हे सगळेच विमान आणि इमारतीच्या ढिगाराखाली दबले होते. रायटर्सच्या वृत्तानुसार, अपघात घडला त्यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने दृश्यता सुद्धा कमी होती. अपघाताच्या कारणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

दोषींना कठोर शिक्षा होईल -राष्ट्राध्यक्ष
 
कझाखस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासम झोमार्ट यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक समितीची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असेही ते पुढे म्हणाले. कझखस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे.