आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवासी वाहन विक्रीत 34% वाढ : फाडा, वाहन कंपन्यांनी वर्षाअखेर दिलेल्या ऑफरचा परिणाम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डिसेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये जानेवारीमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात पूर्ण देशात २.७१ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली. डिसेंबरमध्ये २.०२ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. वाहन कंपन्यांनी वर्षाअखेर दिल्या जाणाऱ्या ऑफर जानेवारीमध्येही कायम ठेवल्या होत्या. यामुळे विक्रीमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. वाहन उद्योगातील डिलरांची संघटना फाडाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. 

 

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर असोसिएशन (फाडा)ने हे आकडे देशातील १,४३७ मधील १,०८१ विभागीय परिवहन कार्यालयात (आरटीओ) झालेल्या वाहनांच्या नोंदणीच्या आधारे जारी केले आहेत. त्यानुसार जानेवारीमध्ये एकूण ११.८९ लाख दुचाकी वाहनांची विक्री झाली. डिसेंबरमध्ये विक्री झालेल्या ११,४१,२०९ दुचाकी वाहनांच्या तुलनेमध्ये ही विक्री ४.२५ टक्के जास्त आहे. व्यावसायिक वाहनांची विक्री जवळपास समानच राहिली. 


फाडाचे अध्यक्ष आशिष हर्जराज काळे यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये प्रवासी वाहन खरेदी संदर्भात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात चौकशी केली होती, त्याचा फायदा झाला. या चौकशीतून भविष्यात खरेदीचीही अपेक्षा होती. कंपन्यांनी वर्षाच्या अखेरीस असलेल्या आॅफर जानेवारी मध्येही कायम ठेवल्या होत्या. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विक्रीत वाढ दिसून अाली. काही नवीन गाड्या लाँच झाल्यामुळेही विक्रीत वाढ झाली आहे. सरकारने अंतरीम अर्थसंकल्पात सामान्यांना प्राप्तिकरात सूट दिली आणि कृषी क्षेत्राला दिलासा देण्याचे उपाय केले आहेत. यामुळे लोकांची खर्च करण्याची शक्ती बरीच वाढणार आहे. त्यामुळे दुचाकी, छोटे व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टर यंाची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. 

बातम्या आणखी आहेत...