Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Passport by fake documents after conversion 

धर्मांतरानंतर खोट्या कागदपत्रांवर पासपोर्ट काढला, 5 दिवस कोठडी 

प्रतिनिधी | Update - Jan 14, 2019, 06:28 AM IST

उदगीरमधील प्रकार, टांझानियात धर्म परिषदेला जाण्याचा आरोपीचा दावा 

  • Passport by fake documents after conversion 

    लातूर- मूळच्या तेलगंणातल्या आणि सध्या उदगीरच्या बेकरीत काम करणाऱ्या नरसिंग भुयकर या तरुणाने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला. मोहंमद असे नाव धारण केल्यानंतर त्याने आई-वडिलांची नावेही मुस्लिम असल्याची खोटी कागदपत्रे तयार करून पासपोर्ट काढला आहे. टांझानिया देशात आयोजित केलेल्या एका मुस्लिम धर्म परिषदेला जाण्यासाठी हा खटाटोप केल्याचा दावा तो करीत असून लातूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे.

    तेलंगणातील जहिराबादचा नरसिंग जयराम भुयकर (३०) हा तरुण काही वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये आला. तेथील उमा चौकात असलेल्या कोहिनूर बेकरीत तो काम करायचा. उदगीरला आल्यानंतर तो त्याच्या मुस्लिम मित्रांच्या मदतीने काही मौलांनाच्या संपर्कात आल्यानंतर त्याने धर्मांतर केले. त्याने मोहंमद रहेमान इबनेआदन असे नाव धारण केले. पासपोर्टसाठी त्याने मोहंमद रहेमान इबनेआदन या नावाचे आधार कार्ड, पॅनकार्ड तयार करून घेतले. उदगीरच्या एचडीएफसी बँकेत खातेही काढले. पुढे त्याने खदीर इमाम शेख (३०, रा. उदगीर) या एजंटाच्या मदतीने पासपोर्टसाठी अर्ज केला. पत्त्याच्या रकान्यात खोटी माहिती भरली. उदगीर पोलिसांनी हा पत्ता बनावट असल्याचे नमूद करून पासपोर्ट कार्यालयाला अहवाल पाठवल्याने त्याला पासपोर्ट मिळू शकला नाही. मात्र त्याने नईम अब्दुल सत्तार साबेर या दुसऱ्या एजंटामार्फत नवा अर्ज सादर केला. दुसऱ्या वेळी त्याने पूर्ण तयारी केल्यामुळे त्याचा अर्ज मंजूर होऊन त्याला वर्षभरापूर्वी पासपोर्टही (क्रमांक आर-९७९०७२४) मिळाला होता. याची कुणकुण लातूरच्या दहशतवाद विरोधी पथकाला लागली. पोलिसांनी पाळत ठेवून याची माहिती काढली आणि शनिवारी नरसिंग ऊर्फ मोहंमदला ताब्यात घेतले.

    नरसिंगचे ब्रेन वाॅश
    नरसिंग भुयकरचे पूर्णपणे ब्रेनवॉश करण्यात आले आहे. हिंदू असलेला नरसिंग मोहंमद बनल्यानंतर आता पाच वेळा नमाज पढतो. दाढी वाढवून मुस्लिम समाजाचा पारंपरिक पेहराव करतो. एखाद्या सामान्य मुस्लिम तरुणापेक्षाही त्याची मुस्लिम धर्माबद्दलची धारणा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Trending