Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Passport office in shrirampur Soon; MP Sadashiv Lokhande will take follow up

श्रीरामपुरात लवकरच पासपोर्ट कार्यालय; खासदार सदाशिव लोखंडे करणार पाठपुरावा

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 11:05 AM IST

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत बँकेच्या सर्व सेवा-सुविधा नागरिकांना घरपोहोच मिळतील. लवकरच प

 • Passport office in shrirampur Soon; MP Sadashiv Lokhande will take follow up

  श्रीरामपूर- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत बँकेच्या सर्व सेवा-सुविधा नागरिकांना घरपोहोच मिळतील. लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरू करून लोकांची गैरसोय दूर करण्यात येईल, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रविवारी सांगितले.


  येथील भारतीय डाक कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्््घाटनप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, पोस्टाचे प्रबंधक यू. एस. जनावडे, बँक व्यवस्थापक वेंकटराव डारला, सहव्यवस्थापक स्नेहल मेश्राम आदी उपस्थित होते.


  खासदार लोखंडे म्हणाले, अंगठ्याचा वापर करत मोदींनी पोस्टल बँकेतून सही न करता पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी लोक पोस्टमनची वाट बघत असत. आता सोशल मीडिया, मेल, एसएमएस या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पोस्टाच्या सुविधा बंद पडण्याच्या स्थितीत होत्या. पण आता या उपक्रमामुळे पोस्टाला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन सर्वसामान्यांना चांगली सुविधा मिळेल. खासगी व राष्ट्रीयकृत बँकेत पुढारी गेले तरच ते लोक बोलतात. मात्र, पोस्टल बँकेचा माणूस थेट आपल्या दारात हजर होणार असल्यामुळे वेळ वाचणार आहे.


  राज्यात नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये श्रीरामपूरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासंबंधीचे सर्व्हेक्षण नुकतेच झाले आहे. पुढील कार्यवाही लवकर होईल. त्यासाठीचा पाठपुरावा मी करत आहे, असे खासदार लोखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


  आमदार कांबळे म्हणाले, तळागाळातील लोकांना ही सुविधा मिळणार अाहे. पैशांची देवानघेवाण करता येईल, तीही घरच्या घरी. त्यामुळे ही योजना खऱ्या अर्थाने सेवा देणारी आहे. खासदार लोखंडे यांनी केंद्रामध्ये वजन वापरून लोकांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.


  नगराध्यक्ष आदिक म्हणाल्या, या उपक्रमाला बँक आपल्या दारी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एक फोन लावल्यानंतर पोस्टल बँकेचा माणूस आपल्या दारात पैसे घेऊन येणार असल्याने सर्वसामान्यांसाठी फार चांगली सुविधा निर्माण झाली आहे. या इमारतीचे आणि माझे जुने नाते असून माझे वडील दिवंगत गोविंदराव आदिक यांनी या इमारतीसाठी मंजुरी आणली होती, असेही त्यांनी सांगितले.


  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबंधक जनावडे यांनी केले. सूत्रसंचालन विजय कोल्हे यांनी केले. यावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, शिवसेनेचे अशोक थोरे, नगरसेवक रवी पाटील, राजेंद्र पवार, सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

Trending