आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटपडताळणी एक नाटक होऊ नये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्राचे शैक्षणिक क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शासनाने पटपडताळणीचा एक स्तुत्य उपक्रम राबवला, परंतु या पटपडताळणीत ज्या शैक्षणिक संस्था, शाळा, मुले, शिक्षक बोगस म्हणून समोर आल्या आहेत, त्यांचे पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही. ते बोगस म्हणून जरी उघडकीस आले असले तरी त्यांचा कार्यभाग सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. पटपडताळणी केवळ नावाला झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पटपडताळणीत बोगस म्हणून सापडलेल्या शाळा, संस्था आणि शिक्षक यांना पात्र ठरवणाºया शिक्षणाधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. तसेच आजपर्यंत घेतलेल्या अनुदानाची रक्कमही वसूल करण्याची आवश्यकता आहे. असे जर झाले नाही तर शासनाने केलेली पटपडताळणी केवळ एक नाटकच होईल. जनता लक्ष ठेवून आहे.