आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Patamundai Plumbers Village In Odisha, 70% Of The Country's Plumbing Workmen In The District

ओडिशातील पट्टामुंडाई प्लंबरांचं गाव, देशातील ७०% नळ कारागीर एकाच जिल्ह्यातील; वार्षिक ३० लाखांपर्यंत पॅकेज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रपाडा (ओडिशा) - ओडिशातील केंद्रपाडा जिल्हा खरे तर भितरकनिका राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. येथील ऑलिव्ह रिडले कासव पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. मात्र, आता येथील प्लंबर्सनी जगात ओडिशाची नवी ओळख निर्माण केली आहे. कारण देशातील ७० टक्के प्लंबर्स येथूनच गेलेले आहेत. हा व्यवसाय त्यांना वार्षिक ३० लाख कमाई करून देत आहे.

जिल्ह्यातील पट्टामुंडाईस्थित स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ प्लंबिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य निहार रंजन पटनायक यांनी सांगितले की, ही कला येथील लोकांनी १९३० मध्ये आत्मसात करायला सुरुवात केली होती. तेव्हा कोलकात्यात दोन ब्रिटिश कंपन्यांना प्लंबर्स लागणार होते. केंद्रापाडातील काही युवकांना तेथे नोकरी मिळाली. नंतर देशाची फाळणी झाली तेव्हा कोलकात्याचे बहुतांश प्लंबर्स पाकिस्तानात निघून गेले आणि केंद्रपाडातील प्लंबर्सचे महत्त्व वाढत गेले. येथे ही कला शिकण्यासाठी देशभरातून लोक येतात. कोलकात्यातून हे लोक देशाच्या अन्य भागांतही पोहोचले. आता पिढ्यान््पिढ्या ही कुटुंबे प्लंबिंगचे काम करतात. १९७० च्या दशकात आखातात गेलेल्या या लोकांची कमाई महिना ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत आहे. म्हणूनच अवघी ५० हजार लोकसंख्या असलेल्या पट्टामुंडाईत १४ बँकांच्या शाखा आहेत. 

प्लंबिंग आणि रिअल इस्टेटमध्ये कार्यरत नरेंद्र राऊत सांगतात, प्लंबिंगची मोठी कंत्राटे भलेही नामांकित कंपन्या घेत असतील, परंतु या कंपन्या पुन्हा पट्टामुंडाईच्याच ठेकेदारांनाही उपकंत्राटे देतात. आता कटक येथील प्लंबिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटही या गावात हलवण्यात आली आहे. येथून दरवर्षी ९६ मुले पासआऊट होतात. नाव झाल्यामुळे या मुलांनाही पंचतारांकित हॉटेल, सरकारी कार्यालये, वकिलातींमध्ये सहज नोकऱ्या मिळतात. 
 

९० वर्षांपासून प्लंबिंगच्या व्यवसायाची परंपरा
1930 मध्ये केंद्रपाडाच्या काहींनी  ब्रिटिश कंपन्यांत काम करणे सुरू केले.
1970 च्या दशकात येथील प्लंबर इतर देशांसह आखाती देशांतही जाऊ लागले.
2010 मध्ये येथील लोकांची या क्षेत्रातील कला पाहून पट्टामुंडाईत प्लंबिंग इन्स्टिट्यूट सुरू झाले. 
 
8 लाख एकूण प्लंबर देशात. इंडियन प्लंबिंग स्किल कौन्सिलची आकडेवारी.
70% म्हणजे सुमारे ५.६० लाख ओडिशातील केंद्रपाडाचे.
30%   वाटा देशातील इतर क्षेत्रांत कार्यरत प्लंबर्सचा आहे.
 

बातम्या आणखी आहेत...