आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफरीदाबाद - दिल्लीला लागून असलेल्या हरियातील फरिदाबादमध्ये नात्यांना काळीमा लावणारी घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनी आपलेच सख्खे काका आणि मोठे बाब यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. या दोन्ही मुलींच्या आई-वडिलांनी जगातून निरोप घेतला. तेव्हापासूनच या मुली आपल्या चुलत्यांसोबत राहत होत्या. काका आणि मोठे बाबांकडून रोज-रोज होणाऱ्या छेडछाड आणि लैंगिक शोषणाला कंटाळून अखेर त्या घरातून पळाल्या. यानंतर त्या दोघींनी आपल्या मावशीला आपबिती सांगितली.
वडिलांचा खून, आईची आत्महत्या...
> फरिदाबादला राहणाऱ्या या अल्पवयीन मुलींच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वीच खून झाला होता. हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी या मुलींचा आईला अटक केली होती. आपल्या पतीची हत्या आणि आपल्यालाच तुरुंगवास झाल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
> वडिलांचे छत्र हरपल्यानंतर काका आणि मोठे बाबांनी त्या मुलींना आपल्या घरात आपल्या मुला-मुलींसोबत ठेवले होते. ते नेहमीच या मुलींची छेड काढायचे आणि अश्लील वर्तन करायचे अशी तक्रार करण्यात आली आहे.
> तुरुंगात असताना आपल्या मुलींचे काय होत असेल ही चिंता त्या आईला नेहमीच होती. अनेकवेळा ती या मुलींना भेटण्यासाठी जामीन घेऊन तुरुंगातून बाहेर देखील आली. परंतु, दोन्ही काकांनी तिची भेट होऊ दिली नाही. या सर्व गोष्टींना कंटाळून त्या आईने आत्महत्या केली.
> तेव्हापासून दोन्ही काकांकडून या अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणखी वाढले. दररोज ते या मुलींसोबत अश्लील वर्तन करत होते. मात्र, त्यानंतर थेट शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. नकार दिल्यास हे दोघे आपल्या पुतणींना बेदम मारहाण करायचे.
> अखेर जीव मुठीत या मुलींनी त्या घरातून पळ काढला आणि आपल्या मावशीकडे पोहोचल्या. याच ठिकाणी येऊन त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. तसेच मावशीसोबत काकांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
फरार झाले आरोपी...
फरीदाबादच्या या घटनेची पोलिस आयुक्तालय आणि महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला आयोगाने यासंदर्भात तत्काळ कारवाईचे आदेश दिले. तसेच आरोपींच्या विरोधात POCSO आणि इतर गंभीर कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला. आपल्याविरोधात तक्रार दाखल होत असल्याचे कळताच दोन्ही काका फरार झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.