आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनन्या आणि भूमी यांनी शेअर केले खास अनुभव, अनन्या म्हणाली, आलिया भट माझी आदर्श

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा ‘पती, पत्नी और वो’  हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पहिल्यांदाच तीन स्टार स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘पती, पत्नी और वो’ हा 1978 मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर मुख्य भूमिकेत होते. 

या चित्रपटाच्या निमित्ताने भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. 

  • आलिया माझी आदर्श, तिच्याकडून अभिनयाचे बारकावे शिकतेय - अनन्या पांडे

मी अभिनयाबद्दल खूप गंभीर आहे. प्रत्येक पाऊल जपून ठेवते. माझ्या सीनियसर्च्या हिट आणि फ्लॉपकडून बरेच काही शिकत आहे. मी त्यांच्या गाेष्टीचे अनुसरण करते. मी आलिया भट्टला आदर्श मानते, ज्या प्रकारे तिने आपल्या कारकीर्दीला उंचीवर नेले. माझ्यासाठीदेखील ही एक मोठी गोष्ट आहे. मी तिला बघून बरेच काही शिकते. तिने करिअरची सुरुवात केली तेव्हा ती खूपच लहान होते, तिच्या प्रत्येक चित्रपटातून मी काही ना काही शिकत आहे आणि अभिनय सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मी परिपूर्ण असल्याचा तिने कधी दावा केला नाही. तिला सर्व काही माहीत आहे. मला तिची हीच गोष्ट आवडते. आलिया ही देशातील एक उत्कृष्ट कलाकार असल्याचे मला वाटते.  अनन्या पुढे म्हणाली..., आलियाला तिच्या करियरच्या सुरुवातीला जनरल नॉलेजमुळे ट्रोल करण्यात आले होते. तिची बरीच थट्टा उडवण्यात आली होती. त्याविषयी अनन्या म्हणते, मला तिची ती गोष्टदेखील खूप आवडली होती, जेव्हा तिला कोणी ट्रोल करायचे. तिच्यावर अनेकदा मीम्सदेखील आले. तिला टोमणे मारण्यात आले मात्र तिने कधीच मनावर घेतले नाही. तरुणांकडून चुका होत असतात, त्यात सुधारणा करून आम्ही पुढे जाऊ असेच ती नेहमी म्हणायची. कुणी आपली चूक मान्य करत नाही मात्र आलियाने आपल्या चुका मान्य केल्या ही मोठी गोष्ट आहे. आलियाप्रमाणे मलाही शाळेच्या दिवसांत ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागले होते. माझ्या जनरल नॉलेजवरदेखील अनेकदा थट्टा उडवली जायची. काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांना टोनी स्टार्क म्हणून हिणवले होते. त्यावरदेखील बरीच ट्रोलिंग झाली होती. सोशल मीडियामध्ये तर सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस असो ट्रोलपासून वाचू शकत नाही.

  • माझे पात्र साध्या भोळ्या पत्नीची प्रतिमा माेडून काढेल -भूमी पेडणेकर

"या चित्रपटात मी वेदिका नावाच्या एका विवाहित महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील माझे पात्र हिंदी सिनेमात वर्षानुवर्षे दाखवण्यात आलेले आणि लोकांनी पाहिलेल्या पत्नीच्या अगदी उलट आहे. पारंपरिक आणि साधी भोळी पत्नी म्हणून मी वेदिकाचे पात्र साकारलेले नाही, जी हिंदी सिनेमात बऱ्याचदा स्वत:पेक्षा तिच्या पतीला जास्त महत्त्व देताना दिसते. त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घेते, स्वत:कडे दुर्लक्ष करते आणि तो नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष करत जातो. मात्र यातील पात्र तसे नाही ते अगदी उलट आहे, ती तिच्या पतीवर प्रेम करते, परंतु ती स्वत: वरही प्रेम करते आणि आधुनिक काळातील मुलीप्रमाणेच तिचे रिलेशनशिप आणि लग्न यात संतुलन साधण्याचा करण्याचा प्रयत्न करते. मला हे खूप आवडले. हिंदी सिनेमात दाखवण्यात आलेल्या वेदिकाचे पात्र आतापर्यंत पत्नीची प्रतिमा मोडून काढेल. या चित्रपटात ती एक धाडसी, तरुण मुलगी म्हणून दिसेल, ती स्वत: चे आयुष्य आपल्या पद्धतीने जगते आणि पतीचा सामना करण्यास घाबरत नाही. यासह ती त्याला भावनिक आधारदेखील देते. हे पात्र आधुनिक भारतीय मुलीचे आहे जी लग्नानंतरही तिचा स्वाभिमान आणि तिचे व्यक्तिमत्त्व विसरत नाही, त्यामुळे मी याला होकार दिला. ट्रेलरमध्ये भूमी चित्रपटातील हीरो कार्तिक आर्यनला बोल्ड शैलीत म्हणते, तिला सेक्स खूप आवडते. तुम्ही ट्रेलरमध्ये वेदिकाला पाहा ती खूपच बोल्ड आहे. ती कुणालाच घाबरत नाही."