आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Pati Patni Aur Woh' Earned 9 Crores On The First Day, Becoming The Biggest Opener Film Of Karthik Aryan

'पती पत्नी और वो'ने पहिल्या दिवशी कमावले 9 कोटी रुपये, ठरला कार्तिकचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे स्टारर 'पती पत्नी और वो' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात झाली आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 9.10 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट केले, "पानिपत या मोठ्या चित्रपटासोबत स्क्रिन वाटल्या गेल्यानंतरही 'पती पत्नी और वो'चा पहिला दिवस शानदार ठरला. दुस-या आणि तिस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली दिसेल." 

  • कार्तिकच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट...

आदर्श यांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले, हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील आजवरचा मोठी ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. त्याने 'लुका छुपी' या आपल्याच चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. याचवर्षी 1 मार्च रोजी रिलीज झालेल्या 'लुका छुपी'ने पहिल्या दिवशी 8.01 कोटींची कमाई केली होती. 

  • कार्तिकचे टॉप 5 पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

 

रँकचित्रपटरिलीज डेटपहिल्या दिवसाची कमाई 
1पती पत्नी और वो6 डिसेंबर 20199.10 कोटी रुपये
2लुका छुपी1 मार्च 20198.01 कोटी रुपये
3प्यार का पंचनामा 216 ऑक्टोबर 20156.80 कोटी रुपये
4सोनू के टीटू की स्वीटी23 फेब्रुवारी 20186.42 कोटी रुपये
5प्यार का पंचनामा20 मे 201192 लाख रुपये