आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Pati, Patni Aur Woh' Earned Five Crores On Monday, May Touch Rs 50 Crores By The End Of The Week

'पती, पत्नी और वो'ने सोमवारी जमवला पाच कोटींचा गल्ला, आठवड्याच्या शेवटपर्यंत 50 कोटींच्या घरात पोहोचणार कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः कार्तिक आर्यन स्टारर 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी पाच कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितल्यानुसार, हा चित्रपट या आठवड्याच्या अखेरपर्यंत 50 कोटींची कमाई करु शकतो. चित्रपटाने सोमवारपर्यंत बॉक्स ऑफिसवर 41 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात कार्तिकसह भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘पती पत्नी और वो’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी 9.10 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या कमाईमध्ये वाढ होत 12.33  कोटींची कमाई केली आहे. तसेच रविवारी चित्रपटाने 14.51 कोटींची कमाई केली. तर सोमवारी कमाईचा आकडा  5.70 कोटींच्या घरात आहे. एकंदरीत चित्रपटाने 41.64 कोटींचा गल्ला जमावला आहे. भूषण कुमार आणि रेणु रवी चोप्रा यांचा हा चित्रपट रविवारपर्यंत कमाईचे अर्धशतक गाठू शकतो. तरण आदर्श यांच्या मते, सोमवारच्या कमाईचा आकडा बघता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करतोय. त्यामुळे 50 कोटींच्या आकड्याचा अंदाज बांधता येऊ शकतो.  खास गोष्ट म्हणजे 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी'सारखे हिट चित्रपट देणा-या कार्तिक आर्यनचा 'पती, पत्नी और वो' हा चित्रपट हायेस्ट ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 9 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचा निर्मिती खर्च 30 कोटी रुपये असून आतापर्यंत कमाईच आकडा 41 कोटी झाला आहे.  हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे त्रिकूट पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत असल्याचे दिसत आहे.