आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसवून हसवून लोटपोट करतो 'पती पत्नी और वो'चा फर्स्ट हाफ, इमोशनल करते इंटरर्व्हलनंतरची कहाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग3/5
स्टारकास्टकार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे आणि अपारशक्ती खुराणा
दिग्दर्शकमुदस्सर अजीज
निर्माताभूषण कुमार, रेणु देवी चोप्रा, जूनो चोप्रा आणि कृष्ण कुमार
संगीतकारतनिष्क बागची, रोचक कोहली, सचेत-परम्परा आणि टोनी कक्कर 
श्रेणीकॉमेडी
कालवधी126 मिनिटे

बॉलिवूड डेस्कः दिग्दर्शक मुदस्सर अजीजच्या'पती पत्नी और वो'ची कहाणी ही लखनऊ (उत्तर प्रदेश) च्या चिंटू उर्फ अभिनव त्यागी (कार्तिक आर्यन) ची आहे, जो एक हुशार विद्यार्थी आहे. त्याचे लग्न सुंदर-सुशील आणि सोज्वळ असलेल्या वेदिका (भूमी पेडणेकर) सोबत होते. दोघांचे हे अरेंज मॅरेज असते. चिंटू इंजिनिअर असून एका कंपनीत नोकरी करतो. तर वेदिका शिक्षिका असते. दोघेही दिल्लीत स्थायिक होतात. लग्नाच्या केवळ तीन वर्षांतच चिंटूचे मन संसारात रमेनासे होते. याच काळात त्याच्या आयुष्यात मॉडेल तपस्या सिंह (अनन्या पांडे) ची एन्ट्री होते. त्यानंतर तयार होतो लव्ह ट्रँगल. येथून पुढे कथानक ट्विस्ट येतो. वेदिका चिंटू आणि तपस्याला एकत्र बघते आणि त्यानंतर चिंटू तिच्यासोबत खोटे बोलत असल्याचेही तिच्या लक्षात येते. वेदिका आणि तपस्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर चिंटुला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले, हे चित्रपटात अतिशय मजेशीर पद्धतीने रेखाटण्यात आले आहे. चित्रपटात अपारशक्ती खुराणाने कार्तिकचा मित्र फहीम रिझवीची भूमिका वठवली आहे. 


चित्रपटात लखनऊ आणि कानपूरमधील अनेक रिअल लोकशन्स दाखवण्यात आले आहेत. अनेक नवीन आणि जुने संवाद प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झाले आहेत. संवाद दुहेरी अर्थाचे आहेत पण ते अश्लिल वाटत नाहीत.  हा चित्रपट 1978 साली आलेल्या बी.आर.चोप्रांच्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटाचा रिमेक असला तरी चित्रपट पाहताना कुठेही कमतरता जाणवत नाही, हेच दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचे यश आहे. 

अभिनयाविषयी बोलायचे झाल्या, चिंटू त्यागीच्या भूमिकेतून कार्तिक आर्यनने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. तर भूमीनेही तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अनन्या पांडेनेही भूमिकेत जीव ओतला आहे. चिंटू त्यागीच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या अपारशक्ती खुराणाने भूमिका उत्तम निभावली आहे.  चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना हसवतो तर दुसरा भाग इमोशनल करतो. क्लायमॅक्स प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.  

चित्रपटातील गाणी आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आली आहेत. पण ती ओठी रेंगाळत नाहीत. एकंदरीतच हा चित्रपट फुल ऑन एन्टरटेन्मेंट आहे.   

बातम्या आणखी आहेत...