आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Patidar Community Leader Hardik Patel Wife Kinjal Patel Latest News And Updates On Patidar Community Leader Missing

हार्दिक पटेल 20 दिवसांपासून बेपत्ता, गुजरात प्रशासन त्यांना टार्गेट करतंय - पत्नी किंजलचा आरोप

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किंजलने एक व्हिडिओद्वारे सांगितले की, हार्दिकच्या ठावठिकाण्याबद्दल कोणतीही माहिती नाही
  • 11 फेब्रुवारी रोजी हार्दिकच्या ट्विटद्वारे अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यात आले

अहमदाबाद - पाटीदार नेता हार्दिक पटेल मागील 20 दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांची पत्नी किंजल पटेलने गुजरात प्रशासनावर आपल्या पतीला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. किंजलने एका व्हिडिओद्वारे म्हटले की, "आम्हाला त्यांच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नाही. त्यांच्या बेपत्ता झाल्याने आम्ही चिंताग्रस्त झालो आहोत." दरम्यान हार्दिकला देशद्रोहाच्या आरोपाखाली 18 जानेवारी रोजी अटक केली होती. 

किंजलने म्हटले की, 2017 मध्ये सरकार म्हटले होते की, पाटीदारांवर लावण्यात आलेले सर्व आरोप परत घेतले जाईल. मग ते एकट्या हार्दिकलाच का लक्ष्य बनवत आहेत. भाजपत सामिल झालेल्या पाटीदार आंदोलनाच्या त्या दोन नेत्यांवर कारवाई का केली जात नाही. हार्दिक यांनी लोकांशी भेटावे असे सरकारची इच्छा नाही. त्यांनी सार्वजनिक समस्या उपस्थित करणे थांबवावे अशी सरकारची इच्छा आहे.

भाजपविरोधात लढा सुरूच राहील: हार्दिक


हार्दिक यांनी 11 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. त्याअगोदर 11 फेब्रुवारी रोजी हार्दिकने ट्वीट केले होते. यामध्ये म्हटले होते की, चार वर्षांपूर्वी गुजरात पोलिसांन माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल दाखल केला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्यावर केलेल्या आरोपांची यादी अहमदाबाद पोलिस कमिश्नरांकडे मागितली होती. मात्र हा आरोप त्या यादीत नव्हता. 15 दिवसांपूर्वी पोलिस अचानक मला ताब्यात घेण्यासाठी माझ्या घरी आले होते, मात्र मी त्यावेळी घरी नव्हतो. 

देशद्रोहाच्या खटल्याबाबत अहमदाबाद ट्रायल कोर्टात हजर न झाल्याने हार्दिकला 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. सुटकेनंतर त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचे संकेत ट्विटद्वारे दिले होते.

2015 मध्ये हार्दिकवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता


2015 मध्ये गुन्हे शाखेने हार्दिक पटेल यांच्यावर भडकाऊ टिप्पणी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. हार्दिकने आपल्या समर्थकांना आरक्षणामुळे आत्महत्या न करता पोलिसांना मारण्याचे सांगितले होते असा आरोप करण्यात आला होता. अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानावर पाटीदार समर्थक समर्थकांच्या रॅलीनंतर झालेल्या राज्यव्यापी तोडफोड आणि हिंसाचारप्रकरणी गुन्हे शाखेने त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये एक पोलिस कर्मचाऱ्यासह अंदाजे 12 जणांचा मृत्यू झाला होता.