आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर त्याच्यावर करत होते ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया, तो म्हणत होता हनुमान चालीसा; डॉक्टर म्हणाले, त्याच्या प्रतिसादामुळेच शस्त्रक्रिया करण्यात आले यश...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थानमधील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी 30 वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असताना तो चक्क तो हनुमान चालीसा म्हणत होता.  जयपूरमधील नारायणा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला असून हुलास मलला (वय 30) असे या रुग्णाचे नाव आहे. डॉक्टरांनी दावा केल्यानुसार राजस्थानमध्ये अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून 72 तासांनंतर हुलासला डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

 

न्यूरो सर्जन तज्ज्ञ डॉ. केके बंसल यांनी सांगितल्यानुसार, हुलासच्या मेंदूत ग्रेड-2 चा ट्युमर होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर 'अवेक क्रानियोटोमी' नावाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. या शस्त्रक्रियेत रुग्नाला शुद्धीवर ठेवून शस्त्रक्रिया केली जाते. शरीराच्या ज्या भागावर ही शस्त्रक्रिया करायची आहे तिथे 'एनेस्थीसिया' नावाचे इंजेक्शन देऊन भूल दिली जाते. या शस्त्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यंत कमी वेळेत रुग्ण बरा होतो. हुलासवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो हनुमान चालीसा म्हणत होता. त्याच्या चांगल्या प्रतिसादामुळे डॉक्टरांनाही ही दुर्मिळ प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...