आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णांना झटके, 'आयसीयू'त दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात बुधवारी रात्री काही रुग्णांना इंजेक्शन देताच त्यांना झटके येऊ लागले व त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. रुग्णांच्या नातेवाइकांनी परिचारिकेला जाब विचारला असता तिने उडवाउडवीची उत्तरे देत नातेवाइकांची बोळवण केली. एका रुग्णाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार वार्ड क्रमांक ६ मधील २० रुग्णांना त्रास झाला होता; तर त्यातील एक रुग्ण अत्यवस्थ झाला. लगेच दुसरे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांची स्थिती स्थिर झाली. याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता असा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


बुधवारी रात्रीच्या सुमारास वार्ड क्रमांक सहा मध्ये परिचारीकेने काही नियमितपणे रुग्णांना सलाईनद्वारे इंजेक्शन दिले. परंतु त्यानंतर या रुग्णांना अस्वस्थता जाणवू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील एका रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले, तर चार रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात हलवले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रुग्णालय वर्तुळात गुरुवारी या घटनेच्या चर्चेला उधाण आले होते. 


रुग्णालयात औषधांचा तुटवडा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. औषधांचा तुटवडा असल्यामुळे आहे ते औषधोपचार करण्याची डॉक्टरांवर तथा स्टाफवर वेळ आली आहे. त्यांचा नाइलाज झाल्याने रुग्णांना आहेत ते औषधे द्यावे लागत आहेत. प्रशासन तथा शासकीय स्तरावरून याकडे गांभीर्याने पाहिल्या जात नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...