आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्ताकोबी खाण्यापूर्वी जाणून घ्या ही गोष्ट, अन्यथा गमवावा लागू शकतो जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक सलाद किंवा फास्ट फूडमध्ये आरोग्याला फायदा होईल म्हणून पत्ताकोबी खातात. एम्सचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे डॉ. सूर्याबाली सांगत आहेत, पत्ताकोबी आणि अशाच अनेक भाज्यांविषयी ज्यामध्ये टेपवर्म नामक किडा असतो, जो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. 


का घातक आहे हा किडा? 
डॉ. सूर्याबाली सांगतात की, हा किडा पानांमध्ये लपलेला असतो. या किड्यांची अंडी आणि भ्रूण जाड आवरणाचे असतात. साधारण तापमानात हे मरत नाहीत. हे मेंदूमध्ये जाऊन जीवघेणे ठरू शकतात. ते सांगतात की, चायनीज फूडमध्ये वापरण्यात येणारी पत्ताकोबी जास्त वेळ गरम केली जात नाही. यामुळे या पदार्थांचा धोका जास्त असतो. 


पत्ताकोबी खाण्यापूर्वी जाणून घ्या ही गोष्ट 
- कच्ची कोबी खाणे, चांगल्या प्रकारे न धुणे, याेग्य पद्धतीने न उकडल्याने हा किडा पोटात जातो. 
- हा किडा पोटात जाऊन आतड्यांना चिकटतो आणि तिथे अंडी देतो. 
- या अंड्यांमधून निघणारा लार्वा ब्लडमधून आपल्या शरीराच्या दुसऱ्या भागात आणि मेंदूमध्ये पोहोचतो. 
- मेंदूमध्ये जाऊन हा लार्वा तेथेही अंडे देतो. येथे त्याची वाढ होते. 


- शरीरामध्ये टेपवर्मसारखे किटाणू कोणते नुकसान पोहोचवतात.. 
- टेपवर्म नामक िकटाणू शरीरात गेल्यावर सिस्टिसरकोसिस नामक आजार होऊ शकतो.
- याचे लार्वा मेंदूमध्ये जाऊन मिरगी आणि मेंदूच्या अनेक समस्यांचे कारण होऊ शकतात. 
- हे िकटाणू आतड्यांना चिकटून रक्त शोषतात. यामुळे अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. 
- हे किडे लिव्हर आणि किडनीमध्ये जाऊन सूज आणि जखम निर्माण करू शकतात. 
- पत्ताकोबी, मुळा, टोमॅटो, कोबीसारख्या भाज्या शिजवण्याअगोदर गरम पाण्याने धुऊन घ्या. 


- टेपवर्म दूर ठेवण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी? 
- पत्ताकोबी कच्ची किंवा हाफ बॉइल्ड असू नये. 
- मुळा, गाजर, काकडी यांसारख्या भाज्या चांगल्या प्रकारे सोलून खाव्यात. 
- पत्ताकोबी कापण्यापूर्वी आणि कापल्यानंतर पुन्हा गरम पाण्याने धुवा. 
- पत्ताकोबी, पोर्क मीट, ब्रोकली यांसारख्या फूड्समध्ये टीनिया सोलियम आणि टेपवर्म नामक किडा असतो. हा किडा पत्ताकोबीच्या पानांमध्ये लपलेला असतो आणि सामान्यतः दिसत नाही. 

बातम्या आणखी आहेत...