आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Patthargarhi Movement; Chief Minister Hemant Soren Meeting After Pathalgadi Supporters Killed In Jharkhand

पत्थलगडीचा विरोध केल्यामुळे 7 जणांची निर्घृण हत्या हत्या, अपहरण केल्याच्या 3 दिवसानंतर जंगलात आढळले मृतदेह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सर्व 7 जणांचे रविवारी अपहरण करण्यात आले होते, मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले

चाईबासा- झारखंडच्या चाईबासा जिल्ह्यात पत्थलगडीला विरोध केल्यामुळे 7 जणांची हत्या करण्यात आली आहे. पत्थलगडी समर्थकांनी या सर्वांना पश्चिम सिंहभूमच्या गुलीकेरा गावातून रविवारी किडनॅप केले होते. एडीजी मुराली लाल मीना यांनी आज(बुधवार) सांगितले की, 19 तासांच्या सर्च ऑपरेशनदरम्यान अती नक्सल प्रभावित गुलीकेरा गावपासून 3 किलोमीटर दूर जंगलात या सर्वांचे मृतदेह आढळले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल आहेत. परंतू, सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी पत्थलगडी समर्थकांवरील सर्व गुन्हे परत घेण्याचे वक्तव्य केले होते.


पोलिसांनी सांगितल्यानुसार, पत्थलगड़ी समर्थकांनी रविवारी गावात बैठक बोलवली होती. पत्थलगडीचा विरोध केल्याप्रकरणी उपसरपंच जेम्स बूडसह 7 जणांना बेदम मारहणा करण्यात आली होती. त्यानंतर पत्थलगडी समर्थकांनी सात जणांचे अपहरण करुन त्यांना जंगलात नेले. हे 7 जण परत न आल्यामुळे सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी गुदडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी दुपारी पोलिसांना सूचना मिळाली की, अपहरण केलेल्या 7 जणांचे मृतदेह जंगलात फेकले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तपास मोहिम सुरू केली आणि या सात जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. झारखंडमध्ये पत्थलगडीच्या समर्थनात आतापर्यंत अनेक घटना झाल्या आहेत, पण ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे.

काय आहे पत्थलगडी?

पत्थलगडी आदिवासी समाजाची एक जुनी परंपरा आहे. यात झारखंडमधील काही आदिवासी परिसरात पत्थलगडी करुन ग्राम सभाच सर्वात शक्तिशाली असल्याची घोषणा करतात. पण आता काही लोकांनी यात बदल करुन ही परंपरा आपल्या पद्धतीने राबवली आहे. यात आता एका मोठ्या चपट्या दगडाला जमिनीत गाडले जाते. तसेच, भारतीय संविधानातील कलमांची चुकिची व्याख्या करत गावातील लोकांना सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास भाग पाडले जाते. सरकारी सुविधा आणि मुलांच्या शाळेत जाण्यालाही विरोध केला जातो. कायद्याला बाजुला करुन चुकी करणाऱ्याला पंचायतीत शिक्षा केली जाते. पत्थलगडी समर्थक पारंपरिक शस्त्र हातात घेऊन गावाबाहेर पाहारा देतात. या गावात पोलिस किंवा इतर कोणालाही घुसू दिले जात नाही.