Home | Sports | Other Sports | patty schinder retire from tennis

स्वीस टेनिसपटू पैटी श्वाईडरची टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

Agency | Update - May 29, 2011, 01:45 AM IST

तब्बल 17 वर्षापासून टेनिस विश्वामध्ये आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर महिला एकेरीत वर्चस्व गाजवत असलेल्या स्वीस टेनिसपटू पैटी श्वाइडरने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली.

  • patty schinder retire from tennis

    पॅरिस - तब्बल 17 वर्षापासून टेनिस विश्वामध्ये आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर महिला एकेरीत वर्चस्व गाजवत असलेल्या स्वीस टेनिसपटू पैटी श्वाइडरने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 32 वर्षीय पैटीने 11 अजिंक्यपदासह 59 ग्रँड स्लॅम किताबही पटकावलेला आहे.

    मागील 17 वर्षांपासून पैटीने टेनिस विश्वात आपल्या चमकदार कामगिरीने वेगळाच ठसा उमटवला आहे. दरम्यान,आयोजित पत्रकार परिषदेत पैटीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.या निर्णयामुळेच चाहत्यांसह अनेक टेनिसपटूंना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. आव्हानात्मक खेळी करणाऱ्या टेनिसपटू पैटीच्या या निर्णयामुळे अनेक दिग्गज टेनिसपटूंची भीतीही दूर झाली आहे.

Trending