आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG. 66 वर्षांपासून एका मशीनमध्ये बंद आहे ही व्यक्ती, बाहेर काढताच होईल मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सस- मेडिकल सायन्समध्ये अनेकदा अशा घटना समोर येत असतात, ज्या माणसाच्या समजण्यापलीकडे असतात. अशीच एक घटना आहे टेक्ससमधील पॉल अॅलेक्झांडरची. पॉलला जगातील आठवे आश्चर्य म्हटले तर ते चूक ठरणार नाही, कारण पॉल जवळपास 66 वर्षांपासून एका मशीनमध्ये बंद आहे.

 

यामुळे आहे मशीनमध्ये बंद
पॉल जन्मत:च पोलिओने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या शरीरातील अनेक स्नायूंनी काम करणे बंद केले आहे. आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना स्वत:ला श्वास घेणे कठीण झाले होते. वैज्ञानिकांनी त्यांना मशीनमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा अनेक डॉक्टरांनी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची आशा सोडली होती.

 

> 1952 मध्ये पॉल यांना या आजाराने घेरले होते. त्या वेळेस वैज्ञानिकांनी आयरन लंग चेम्बर नावाची एक मशीन बनवली. ही व्हॅक्यूम मशीन आहे, ज्यात कृत्रिमरीत्या मानवी शरीरात श्वास दिला जातो.

 

मानेखालील संपूर्ण शरीराला झाला होता अर्धांगवायू
पोलिओमुळे पॉल यांच्या मानेखालच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने वैज्ञानिकांचे सांगितल्याप्रमाणे पॉल यांना मशिनमध्ये ठेवण्यास सुरूवात केली. तेव्हापासून पॉल मशिनमध्येच राहतात, त्यांना मशिनमध्येच बंद करून ठेवले आहे.  

 

अशी काम करते ही मशीन 

> हे मशीन व्हॅक्यूम पॅक चेम्बरसारखे आहे, त्यात पंपाच्या माध्यमातून हवा आत-बाहेर सोडली जाते. हवेचा दबाव पॉल यांच्या शरिरावर पडतो, त्यामुळे त्यांचे फुफ्फूसे काम करतात. फॅनच्या माध्यमातून अशूद्ध हवा बाहेर सोडली जाते. 

> याबरोबरच मशिनशिवाय शास्त्रज्ञांनी पौल यांचा खूप काळ अभ्यास केला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पोलिओची लस ही जगभरातील सर्वोत्तम शोध आहे, ज्यामुळे जगभरात तो थांबला आहे जर असे झाले नसते तर अशा मशिनमध्येच लोकांना जिवंत रहावे लागले असते.

 

बातम्या आणखी आहेत...