आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे झाले निधन, ग्रॅज्युएशन डिग्री घेण्यासाठी तिचा कटआउट घेऊन कॉलेजमध्ये पोहोचला युवक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीला - फिलीपाइन्समध्ये एक युवक आपल्या आईचे कटआउट घेऊन डिग्री घेण्यासाठी पोहोचला. पाउलो जॉन एलिंसोग असे या युवकाचे नाव आहे. पाउलोच्या आईचे 2016 मध्ये निधन झाले. पाउलोने म्हटले की, 'माझी आई पदवी समारंभावेळी माझ्यासोबत असावी असे वाटायचे. मला सुद्धा इतरांप्रमाणे माझ्या आईसोबत फोटो घ्यायचा होता. यामुळे मी हा मार्ग अवलंबला. आईने माझ्या प्रत्येक सुखात साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे. मला देखील इतरांप्रमाणे गर्व आहे. आय लव्ह यू आई.'


पाउलोने एक ट्वीट करत लिहिले, 'माझ्या आईला समर्पित. आई तुझा मुलगा ग्रॅज्युएट झाला. मला आशा आहे तुला नक्कीच आनंद झाला असेल. हे सगळं मी तुझ्या इच्छेमुळे केले. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई.'

 

आईने एकटीनेच पाउलोला सांभाळले होते
पाउलो सांगतो की त्याची आई सिंगल मदर होती. तिने एकटीनेच माझे संगोपन केले. सोबतच पाउलोने आपल्या मित्रांना एक संदेश दिला आहे. आपल्याकडे जे आहे त्याची किंमत ठेवा. ते उद्या आपल्याकडे असेल का नाही याबाबत आपल्याला माहित नाही अशाप्रकारचा संदेश पाउलोने दिला आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...