आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 सोप्या स्टेप्समध्ये करू शकता सर्व अडचणी दूर करणाऱ्या महादेवांची पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

21 जानेवारीला सोमवार आणि पौर्णिमा योग जुळून येत आहे. या दिवशी पौष मासातील पौर्णिमा आहे. सोमवारी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी महादेवाची विशेष पूजा करावी. शिवपुराणानुसार महादेवाच्या पूजेने कुंडलीतील दोष दूर होऊन सर्व समस्या नष्ट होऊ शकतात. शिवलिंगावर जल अर्पण करताना एखाद्या शिव मंत्राचा जप करावा. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार पौर्णिमेला या 7 सोप्या स्टेपमध्ये शिव पूजा करू शकता.


शिव पूजा विधी 
सकाळी लवकर उठावे. स्नान करताना शिव मंत्र, तीर्थस्थळ आणि सर्व नद्यांचे स्मरण करावे. स्नान केल्यानंतर शिव पूजा करण्यासाठी पांढरे वस्त्र धारण करावे. एखाद्या शिव मंदिरात जावे किंवा देवघरातच शिव पूजेची व्यवस्था करावी.


आता जाणून घ्या, शिव पूजेच्या स्टेप्स...
1.
शिवलिंगावर जल अर्पण करावे. पंचामृताने अभिषेक करावा. मंत्र ऊँ नम: शिवाय, ऊँ महेश्वराय नम:, ऊँ शंकराय नम:, ऊँ रुद्राय नम: इ मंत्राचा जप करावा.


2. चंदन, फुल अर्पण करावे. धूप-दीप लावा. 


3. महादेवाला बिल्वपत्र अर्पण करावे. धोत्र्याच्या फुल, तांदूळ अर्पण करावेत.


4. फळ किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

 

5. पूजा झाल्यानंतर धूप-दीप, कापूरने आरती करावी.


6. महादेवाचे स्मरण करत अर्धी प्रदक्षिणा घालावी.


7. कुटुंबातील सदस्य आणि इतर भक्तांना प्रसाद वाटावा.

बातम्या आणखी आहेत...