आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर या मंत्र उच्चाराने सूर्यदेवाला द्यावे अर्घ्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 21 जानेवारीला पौष मासातील पौर्णिमा आहे. सोमवारी पौर्णिमा असल्यामुळे एक विशेष योग जुळून आला आहे. या दिवशी महादेव तसेच भगवान श्रीकृष्ण, सूर्यदेव, हनुमान आणि चंद्रदेवाची पूजा करावी. या देवतांच्या पूजेने कुंडलीतील दोष आणि सर्व अडचणी नष्ट होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सोमवार आणि पौर्णिमा योगामध्ये कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात...


पहिले काम : पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा. ऊँ सूर्याय नम: मंत्राचा जप करावा.


दुसरे काम : शिवलिंगावर चांदीच्या कलशाने कच्चे दूध अर्पण करावे. ऊँ सांब सदाशिवाय नम: मंत्राचा जप करावा.


तिसरे काम : भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. कृं कृष्णाय नम: मंत्राचा जप करावा.


चौथे काम : पौर्णिमेला सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावावा आणि प्रदक्षिणा घालाव्यात.


पाचवे काम : पौर्णिमेला चंद्र उदयानंतर चंद्रदेवाला दूध-जल अर्पण करावे. ऊँ सों सोमाय नम: मंत्राचा जप करावा.


सहावे काम : हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर हनुमान चालीसाचा पाठ करावा.

बातम्या आणखी आहेत...