आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरी संत्र्यासाठी पवारांनी थेट चीनला लावला फोन; शेतकऱ्यांना म्हणाले, फळांच्या चांगल्या व्हरायटी आणण्याचा नाद आहे मला!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतुल पेठकर
 

नागपूर- नागपूरी संत्रा जगात प्रसिद्ध आहे. गोड चव, पातळ पापुद्रा आणि साल यामुळे नागपूरी संत्र्याला जगभर मागणी आहे. परंतु नेमकी प्रक्रिया माहिती नसल्याने संत्रा जगभर जात नाही. चीन हा संत्र्यांचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. आपल्या नागपूर दौऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी थेट चrन येथील भारतीय वाणिज्य समन्वयक प्रशांत लोखंडे यांनाच फोन लावून संत्रा निर्यातीविषयी पुढाकार घेण्यास सांगितले. जाणत्या राजाची हा तडफदारपणा पाहून उपस्थित शेतकरीही भारावले. फळांच्या चांगल्या व्हरायटी आणण्याचा मला नादच आहे. त्यामुळे संत्र्याच्याही नवनवीन व्हरायटी आणून निर्यात करू, असे पवार म्हणाले.
आपल्या नागपूर जिल्हा दौऱ्यात सकाळी दहा वाजता शरद पवार यांनी रविभवन सभागृहात िवदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. सुमारे दीडशे शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्व शेतकऱ्यांचे म्हणने लक्षपूर्वक ऐकून घेत त्यांना दिलासा दिला. पंदेकृविचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, माजी मंत्री अनिल देशमुख, महाआॅरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे आदी पाच ते सहा जणांनी एक समिती स्थापन करून संत्र्याबद्दल सविस्तर नोट तयार करण्यास पवारांनी सांगितले. सोमवार 18 रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर समितीच्या सदस्यांच्या शिष्ट मंडळासह स्वत: पवार केंद्रीय अर्थमंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या सचिवांसह अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

संत्र्याचे प्रचंड नुकसान
 
संत्र्याचा आंबीया बहार 50 टक्क्यांच्यावर गळला. तर मृग बहारात फळाचा आकार खूपच छोटा असल्याने नुकसान झाले. शिवाय उन्हाळ्यात 30 ते 40 टक्के झाडे वाळली. पावसामुळे फंगस रोगाचा प्रादुर्भाव झाला. तर काही ठिकाणी डायबॅक रोग झाला. या रोगात झाड वरून वाळत जाते, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. राज्यात प्रामुख्याने िवदर्भात संत्रा होतो. अमरावती, वर्धा, नागपूर हे तीन जिल्हे मिळून दीड लाख हेक्टर क्षेत्र संत्र्याखाली आहे. त्यामध्ये 70 हजार हेक्टर अमरावती, 30 हजार हेक्टर नागपूर, 15 हजार हेक्टर वर्धा तर इतर जिल्हे मिळून 15 हजार हेक्टर क्षेत्र आहे. संत्र्याची एकरी उत्पादकना 7 टन इतकी असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. स्पेनमधील उत्पादकता हेक्टरी 70 ते 100 टन, पंजाबमध्ये किन्नाेची 23 टन आहे. इजरायलमध्ये संत्र्याच्या 12 जाती असून त्यापैकी 4 सिडलेस आहेत. आपल्याकडे नवीन जातीच नाहीत. पवारांनी याची संपूर्ण माहिती घेत संत्र्याच्या गुणवत्तेबद्दल काळजी घेण्यास सांगितले.देशपातळीवर लिंबूवर्गीय फळपिकाखाली 9 लाख हेक्‍टर तर एकट्या विदर्भात दीड लाख हेक्‍टरवर नागपूरी संत्र्याची लागवड होते. त्यातील 85 ते 90 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील झाडे मोठी आहेत. त्यावर फळधारणा होते तर उर्वरित लहान झाडे आहेत. 85 ते 90 हजार झाडांपासून विदर्भात आठ ते नऊ लाख टन उत्पादन होते. तर भारताचे वार्षिक उत्पादन 80 लाख टन आहे. संत्र्याला राजाश्रय न मिळाल्याने नवे निर्यातक्षम, संशोधन आणि पर्यायाने दर्जाच्या बाबतीत संत्र्याची पिछेहाट झाली. मात्र, यापुढे संत्रा चिनसह इतरही देशात निर्यात होईल, असे ठाकरे म्हणाले.प्रोटोकाॅल लिस्टमध्ये नाही संत्रा


शरद पवारांनी लोखंडे यांना भ्रमणध्वनी करून महाआॅरेंजचे ठाकरे व अनिल देशमुख यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्या नंतर काही वेळाने लोखंडे यांनी आपल्याशी संवाद साधल्याचे ठाकरे यांनी सांगितले. प्रायोरिटी प्रोटोकाॅल असताे. देशातील कोणती फळे वा पिके निर्यात करायची याचा एक प्रोटोकाॅल वाणिज्य आणि कृषी मंत्रालयाने ठरवलेला असतो. फळांमध्ये द्राक्ष व डाळींबाचा समावेश आहे. मात्र, संत्रा कुठेच नाही. पवार यांच्या पुढाकाराने संत्र्याचाही समावेश झाल्यास चिनलाही निर्यात करणे शक्य होईल. आपणही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...