आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pawar Saheb, Mistake Is Not Yours, Its Our Udayan Raje Bhosale Answer To Sharad Pawar

पवारसाहेब, चूक तुमची नव्हे, आमची अन‌् जनतेची - उदयनराजे भोसले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘लाेकसभेत उदयनराजेंना उमेदवारी दिली ही आमची चूक हाेती,’ अशी कबुली देणाऱ्या शरद पवार यांना माजी खासदार उदयनराजे भाेसले यांनी प्रत्युत्तर दिले. ‘पवारसाहेब, तुम्ही आदरणीयच आहात. मात्र चूक तुमची नव्हती तर आमचीच हाेती. कारण गेल्या वेळी आमच्याच सांगण्यावरून जनतेने घड्याळाला मते दिली,’ असे ते म्हणाले.
दक्षिण कराडचे भाजप उमेदवार अतुल भाेसले यांच्या प्रचारार्थ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. हा संदेश त्यांनी साेशल मीडियावरही  प्रसारित केला. उदयनराजे म्हणाले, ‘पवारसाहेब, चुकांचीच भाषा बोलतायत तर आता आमचेही ऐका. लोकसभेला चौघेच निवडून आले आणि उर्वरित जागांवर राष्ट्रवादीचा पराभव  झाला, तीसुद्धा आमचीच चूक होती का? सिंचनापासून राज्य वंचित ठेवले ही आमचीच चूक होती का?  मराठा आरक्षणासाठी समाजाची ५० वर्षे फरपट केली, ही चूक तुमचीच नव्हती का?’ असा सवाल उदयनराजेंनी केला.

बातम्या आणखी आहेत...