आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - पुण्यातील कोथरूडमधील भाजपचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ट्रोलिंग सुरूच आहे. या ट्रोलिंगमधून चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ असे नवे नावच मिळाले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही बुधवारी पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांची चांगलीच मौज घेतली. एका प्रश्नावर ते अजित पवार म्हणाले, त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काहीच दिसत नाही. अर्थात ‘चंपा’ म्हणजे नक्की कोण? याचाही उलगडा त्यांनी शाॅर्टफॉर्ममध्ये केला. अजित म्हणाले, “पवार सोडता त्या ‘चंपा’ला काहीच दिसत नाही. जसे अप (AP) म्हणजे अजित पवार, तसेच चंपा म्हणजे (CP), हा असा शॉर्टफॉर्म आहे.
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांपी “पवार घराण्यातील तरुण आगामी काळात भाजपमध्ये येऊ शकतात, तसे झाल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ते उत्तरले, ‘त्यांचे विधान निरर्थकच आहे. शरद पवार राजकारणाबाहेर पडतील, असे ते नेहमीच बरळत असतात. पवार कित्येक पिढ्यांपासून राजकारण करत आहेत. त्यांनी अनेक पावसाळे-उन्हाळे पाहिले आहेत. एकेकाळी त्यांचे ५० आमदार बाहेर पडले, पाचच उरले होते. तरीही ते आज महाराष्ट्राच्या राजकारणात खंबीरपणे उभे आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.