LIC premium / आता घरबसल्या भरू शकता LIC चा प्रिमीअम, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

रजिस्ट्रेशन न करता घेऊ शकता या सुविधेचा लाभ
 

दिव्य मराठी वेब टीम

May 25,2019 04:41:00 PM IST


नवी दिल्ली- भारतीय विमा कंपनी म्हणजे (LIC) ने आता आपल्याला घरबसल्या ऑनलाइन पॉलिसी प्रीमियम भरण्याची सुविधा देत आहे. तसेच, आपण ऑनलाइन एलआयसी पॉलिसी घेणे, पॉलिसी स्टेटस, बोनस स्टेटस, लोन स्टेटस, रिव्हाव्हल कोटेशन इत्यादी सुविधांचा लाभ घेऊ शकता. एकदा पॉलिसीधारकाने ई-सेवाचे रजिस्ट्रेशन करून घेतले की, त्याला अनेक ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येतो.

ई-सुविधांसाठी असे करा रजिस्ट्रेशन
यासाठी एलआयसीची अधिकृत वेबसाइट www.licindia.in वर जाऊन "न्यू यूजर" टॅबवर क्लिक करा. आपला एक युझर आयडी आणि पासवर्डची निवड करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा. ई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी ‘ई-सर्विसेज’ टॅबवर क्लिक करा आणि यूझर-आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. तसेच, दिलेला फॉर्म भरून ई-सुविधांचा फायदा घेण्यासाठी आपली पॉलिसी रजिस्टर करा.


फॉर्म अपलोड करा
फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा. त्या फॉर्मवर स्वाक्षरी करा आणि फॉर्मची प्रत अपलोड करा. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा पासपोर्टचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करा. एलआयसी ऑफिसने पडताळणी केल्यानंतर, आपल्याला एक ई-मेल आणि एसएमएस पाठवला जाईल. त्यानंतर आपन एलआयसीच्या ई-सेवांचा लाभ घेऊ शकता.

रजिस्ट्रेशनशिवाय असा जमा करा प्रीमियम
यासाठी आपल्याला एलआयसीच्या वेबसाइट www.licindia.in वर जाऊन ऑनलाइन सुविधांच्या सेक्शनमध्ये "भुगतान प्रीमियम ऑनलाइन" टॅबवर क्लिक करा. आता "पे डायरेक्ट (लॉगिन शिवाय)" या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये एक नवीन विंडो उघडेल आणि आपले आवडते ब्राउजर निवडण्यास सांगितले जाईल. त्यानंतर ‘रिन्यूअल प्रीमियम’ पर्याय निवडा. मग एक नवीन विंडो उघडेल, त्यात आपला पॉलिसी नंबर, जन्मतारिख, मोबाइल नंबर, किस्त प्रीमियम, ई-मेल आयडी आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चासारखे माहिती भरावी लागेल. नियम आणि अटींचा स्वीकार करा आणि जमा करा. ही सर्व माहिती भरल्यानंतर पेमेंट पेज उघडेल, त्यात आपण एलआयसी पॉलिसीसाठी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बीएचआयएम किंवा यूपीआयद्वारे प्रीमियमचा भरणा करू शकता.

X
COMMENT