• Home
  • Business
  • PayMate Launched 8 years ago with the help of 5 customers, now it has collected more than 40 thousand MSME customers, this year, funded 17 core

Motivational / ८ वर्षे आधी ५० ग्राहकांच्या मदतीने सुरू झालेल्या पेमेटकडे आता ४० हजारपेक्षा जास्त एमएसएमई ग्राहक, यंदा जमवला १७५ काेटींचा निधी

वेब डिझाइन, मोबाइल कंटेंटपासून ते पेमेंट गेटवे व्यवसायापर्यंत झेप

दिव्य मराठी

Aug 20,2019 09:34:00 AM IST

मुंबई - पेमेट या बी२बी डिजिटल कंपनीने या वर्षात १७५ कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. २००६ या वर्षात देशातील पहिली मोबाइल पेमेंट सेवा सुरू करणारी पेमेंट ही आज देशातील प्रमुख बी२बी पेमेंट बिझनेस कंपनी ठरली आहे. कंपनीने २०११ मध्ये कस्टमर पेमेंटच्या माध्यमातून बी२बी व्यवसायात प्रवेश केला. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर वर्षाला ३५,००० कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. कधीकाळी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ अजय आदिसेशन हे व्यवसायामध्ये स्वतःला वेळेनुसार अपडेट ठेवतात.अजय म्हणतात, भविष्याचा विचार करून आम्ही बदल करून अपडेट राहताे. स्वत:मध्ये बदल न घडवणाऱ्या नाेकिया, काेडॅकसारख्या कंपन्याही टीकू शकल्या नाहीत.


अमेरिकेतून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यावर अजय यांनी वेब डेव्हलपमेंट, डिझायनिंगचा व्यवसाय सुरू केला. दूरसंचार क्रांतीच्या वेळेला ते गेम्स अॅप्लिकेशनसारखे मोबाइल कंटेंट दूरसंचार कंपन्यांना दिल्यानंतर ते व्यवसायात उतरले. पेमेंटची समस्या ओळखून अजय यांनी २०११ मध्ये मोबाइल पेमेंट कंपनी सुरू केली.

व्हिसाच्या मदतीने पेमेंटची ९२ देशांत विस्तार याेजना
जगभरात इलेक्ट्राॅनिक पेमेंटची सुविधा देणाऱ्या ‘व्हिसर’बराेबर पेमेटने यंदा भागीदारी केली आहे. याद्वारे पेमेंट ९२ देशांमध्ये व्यवसाय विस्तार करण्याची याेजना आखत आहे. कंपनीचे मुख्य लक्ष्य मध्यपूर्व, आफ्रिका, मध्य आणि पूर्व युराेपवर आहेे. कंपनीचे सीईआे अजय म्हणतात, व्हिसाच्या मदतीने आम्हाला ग्राहक शाेधणे सहज हाेऊ शकेल. या विस्ताराद्वारे २०२० पर्यंत आमच्या प्लॅटफाॅर्मवरून वर्षाला ७० हजार काेटी रुपयांच्या व्यवहाराचे लक्ष्य ठेवले आहे.


ज्याच्याशी मी बोलायचे टाळले, ते फेसबुकचे सहसंस्थापक निघाले

अजय म्हणतात, व्यवसायात कोणालाही सहज समजू नये ना कोणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. एकदा बोस्टन विद्यापीठाचे कुलगुरू भारतात आले होते. मी त्यांना भेटण्याची वेळ मागितली होती. हॉटेल ताजमध्ये मी प्रतीक्षा करत होतो. मला येण्यास उशीर होईल. मी कोणाला तरी पाठवतो, असा त्यांचा मेल आला. काही वेळात त्यांचा विद्यार्थी माझ्याजवळ येऊन बसला आणि व्यवसायाबाबत मला प्रश्न विचारू लागला. काही वेळाने मी त्याला वैतागून विचारले, आधी तुम्ही कोण आहात ते सांगा? तो म्हणाला, मी फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युज आहे.

यशासाठी कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळ बरोबर राहणे गरजेचे

अजय म्हणतात, नवीन स्टार्टअपला टॅलेंटच्या बरोबरीनेच ते चालवणाऱ्या सहकाऱ्यांची जास्त गरज असते. जितके टॅलेंट गरजेचे तितकेच विश्वासू कर्मचारी हवेत. काळानुसार व्यवसायात चढ-उतार येतात. अशा समयी साथ देणाऱ्या लाेकांची गरज असते. स्टार्टअपवर बाेलताना अजय म्हणाले, पहिल्यांदा माझी स्वत:चीच एखाद्या स्टार्टअपबराेबर काम करण्याची इच्छा हाेती. नव्या कल्पनांचा विचार, त्या समजावणे व अंमबजावणी करणे हे शिकणे गरजेचे आहे. हा अनुभव खूप उपयाेगी पडताे.

X