आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Paytm Founder Blackmailed For Personal Data By Lady Employee Demands 20 Crores Extortion

PayTMच्या मालकाला महिला कर्मचाऱ्यानेच केले ब्लॅकमेल, 20 कोटींची खंडणी मागितली, 3 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> थायलंडच्या व्हर्च्युअल नंबरवरून डेटा लीक करण्याची धमकी, सेक्रेटरीला अटक.

> इस्रायलच्या आयटी एक्स्पर्टच्या मदतीने कॉल ट्रेस करण्यात आला.
> पेटीएम फाउंडरने आधी 67 रुपये, मग 2 लाख पाठवून बँक डिटेल्स मिळवले अन् पोलिसांना दाखवले.


नवी दिल्ली - पेटीएमचे फाउंडर विजय शेखर शर्मा आणि त्यांचा भाऊ अजय शेखर यांना ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आरोप आहे की, सेक्रेटरी सोनिया धवननेच डेटा चोरी करून तो सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती. याबदल्यात 20 कोटी रुपयांची डिमांड केली होती. पोलिसांनी सोनियासहित 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. अजय शेखर यांच्या मते, 20 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा थायलंडच्या व्हर्चुअल नंबरवरून डेटा लीक करण्याची धमकी देणारा फोन आला होता. दुसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून विजय यांनाही फोन आला.

 

पोलिस करू शकत नाहीत कॉल ट्रेस: 
अजयने सांगितले की, या कॉलला इस्रायलच्या आयटी एक्स्पर्टच्या मदतीने ट्रेस करण्यात आले. वास्तविक, पोलिस व्हर्च्युअल नंबरला ट्रेस करू शकत नव्हते, यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी इस्रायलच्या एक्स्पर्टची मदत घेतली, यानंतर कोलकात्यात राहणाऱ्या आरोपीचे सत्य समोर आले.

 

आरोपींनी 20 कोटी रुपयांची मागणी केली: 
नोएडाचे एसएसपी अजय पाल शर्मा यांच्या मते, "पेटीएमच्या मालकाने एक महिला आणि तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी कंपनीचा डाटा चोरीला गेल्याची आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती. आरोपींनी त्यांना 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. आम्ही तिघांविरुद्ध एफआयआर दाखल केली. याप्रकरणी ताबडतोब अॅक्शन घेत महिलेसहित 3 जणांना अटक करण्यात आली आहे."

 

अजय म्हणाले, ब्लॅकमेलिंग 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली. आम्ही 10 ऑक्टोबर रोजी फक्त 67 रुपये आरोपीच्या अकाउंटमध्ये टाकून त्याचे बँक डिटेल्स मिळवले. मग 15 ऑक्टोबर रोजी 2 लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या बँक अकाउंटमध्ये जमाही केले. यामुळे आरोपींचा आत्मविश्वास वाढला. मग आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. 

 

असा झाला घटनेचा खुलासा : 
अजय शेखर म्हणाले की, ब्लॅकमेल करणारा कोलकाताचा आरोपी रोहित चोमल याला पैसे दिल्यानंतर नोएडा पोलिसांना माहिती देण्यात आली. चौकशीत कळले की, सोनिया, रूपक आणि कंपनीचा अॅडमिन देवेंद्र हे तिघे मिळून रोहितसोबत या कटात सहभागी होते. याप्रकरणी सेक्टर-20 पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...