आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड चॅम्पियन सिंधू, ताई सर्वात महागड्या खेळाडू; दाेघींना प्रत्येकी 77 लाख

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वर्ल्ड चॅम्पियन पी.व्ही. सिंधूने आता बॅडमिंटन काेर्टपाठाेपाठ आता लीगच्या लिलाव प्रक्रियेतही आपला दबदबा कायम ठेवला. त्यामुळेच ती आता प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. सिंधू आणि नंबर वन ताई जू यिंगला पीबीएलमध्ये सर्वाधिक प्रत्येकी ७७ लाख रुपये मिळाले आहेत. सिंधूला हैदराबाद हंटर्स संघाने ७७ लाखांमध्ये रिटेन केले. तसेच ताई ही गत चॅम्पियन बंगळुरू संघासाेबत करारबद्ध झाली. यासाठी बंगळुरू आणि पुणे या दाेन्ही संघांमध्ये बाेलीचा माेठा सामना रंगला हाेता. यात अखेेर बंगळुरू संघानेच बाजी मारली. भारताच्या प्रणीतलाही बंगळुरू संघाने ३२ लाखांत खरेदी केले. लिलाव प्रक्रियेत पाच संघांनी प्रत्येकी एक खेळाडू रिटेन केला. प्रशिक्षक गाेपीचंद यांची मुलगी गायत्रीला चेन्नई संघाने करारबद्ध केले. सायना आणि कश्यपने या लीगमधून माघार घेतली आहे.

लक्ष्य सेन ३६ लाखांत करारबद्ध
स्काॅटिश आेपनचा १८ वर्षीय लक्ष्य सेन लिलावादरम्यान चर्चेत राहिला. त्याची मूळ किंमत (बेस प्राइस) १० लाख हाेती. मात्र, लिलावाच्या पूर्वसंध्येलाच त्याने किताबाची कमाई केली. त्यामुळे त्याला चेन्नई संघाने ३६ लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले. दुहेरीत सात्त्विकराज-रेड्डी यांच्यावर सर्वात माेठी ६२ लाखांची बाेली लागली आहे.

हे खेळाडू झाले रिटेन
खेळाडू  टीम  रक्कम
पी.सिंधू हैदराबाद हंटर्स 77 लाख
साई प्रणीत बंगळुरू रॅप्टर्स 32 लाख
सुमीत रेड्‌डी चेन्नई सुपरस्टार्स 11 लाख
चिराग शेट्‌टी पुणे 7 एसेस 15.5 ला.
बेईवान झेंग अवधी वारियर्स 39 लाख

एका संघात ११ खेळाडू, यापैकी तीन महिला खेळाडू असतील. पाचव्या सत्राला २० जानेवारीपासून सुरुवात हाेईल. अवधी वारियर्स, बंगळुरु रॅप्टर्स, मुंबई रॉकेट्स, हैदराबाद हंटर्स, चेन्नई सुपरस्टार्ज, नॉर्थ ईस्टर्न वारियर्स, पुणे-7 एसेस हे सात संघ सहभागी हाेतील. प्रत्येक संघात ११ खेळाडू असतील.यात ३ महिला खेळाडू असतील.

बातम्या आणखी आहेत...