आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PCB Sack Sarfaraz Ahmed As Captain From Pakistan's T20I And Test Sides: Azhar Ali Babar Azam

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सरफराजची हकालपट्टी, अजहरकडे टेस्ट तर बाबरकडे टी-20 चे कर्णधारपद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तान क्रिकेट बोर्ड(पीसीबी)ने आज(शुक्रवार) सरफराज अहमदकडून पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधारपद काढून घेतले आहे. त्याच्या जागी अजहर अलीला टेस्ट टीमचे कर्णधारपद आणि बाबर आजमला टी-20 टीमचे कर्णधारपद दिले आहे. परुंतु अद्याप  वनडे टीमच्या कर्णधारपदाच्या नावाची घोषणा झालेली नाहीये. पीसीबीने हा निर्णय ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी घेतला आहे. ऑस्ट्रेलियासोबत पाकिस्तान तीन टी-20 ची एक सीरीज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन टेस्ट खेळणार आहे.

असे मानले जात आहे की, पीसीबीने हा निर्णय पाकिस्तान संघाच्या विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे घेतला आहे. याच महिन्यात श्रीलंकाविरुद्ध टी-20 सीरीजमध्ये पाकिस्तानला 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून संघाचा कर्णधार सरफराज अहमद आणि नवीन कोच मिस्बाह उल-हकदरम्यान वाद झाल्याच्याच बातम्या समोर आल्या होत्या.

 

सरफराज कर्णधार असताना पाकिस्तान चॅम्पियंस ट्रॉफी जिंकला
 
सरफराज कर्णधार असताना पाकिस्तानी टीम वर्ल्ड कपच्या सेमीफाइनलपर्यंत पोहचली होती, पण तिथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तनामध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये विजय मिळवला, पण टी-20 मध्ये पराभून झाली. टीम वर्ल्ड टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. परुंतु, याआधी सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तानने 2017 मध्ये भारताला हरवून चँम्पियंस ट्रॉफी  आपल्या नावावर केली होती.