आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात झाली क्रिकेटची वाईट अवस्था, विदेशी संघतर सोडाच पण पाकिस्तानी खेळाडूंनाही तेथे खेळायची ईच्छा नाही....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि माझी क्रिकेट कॅप्टन इमरान खानची सरकार देशात क्रिकेट जिवंत ठेवण्याच्या प्रयत्न करत आहेत. PCB ने ऑस्ट्रेलिच्या टीमला केलेल्या एका अपीलमध्ये म्हणाले की, पुढच्या वर्षी मार्च- एप्रिलमध्ये यूएईमध्ये सीरीज खेळण्यासाठी आल्यावर कमीत कमी 2 मॅच तरी पाकिस्तानात पण खेळा. पण PCB ला माहित आहे की, ऑस्ट्रेलीया, न्यूझीलंड किंवा साउथ आफ्रीकेच्या टिमला पाकिस्तानात येऊन खेळण्यात काहीही रस नाहीये. ईतकच काय तर, पाकिस्तान सूपर लीग(PSL)मध्ये खेळणाऱ्या रिटायर्ड प्लेयर्सना पण पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाहीये. 

 

PCB काय करत आहे प्रयत्न ?
पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम यूएईमध्ये पाकिस्तान सोबत 5 वनडे मॅचची एक सीरीज खेळणार आहे. पाकिस्तानत क्रिकेटची परिस्थिती ईतकी खालावली आहे की, रमीज राजा आणि सकलेन मुश्ताक सारखे महान खेळाडूही पीसीबी आणि देशाच्या परिस्थितीला नावे ठेवत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये राशिद लतीफने म्हटले की, पाकिस्तानत इंटरनॅशनल मॅच तर काय क्लब क्रिकेट खेळण्यालायक पण मैदान राहिले नाहीयेत. अशी अवस्था असतानाही पीसीबी चेयरमन एहसान मनी ऑस्ट्रेलियाला दोन मॅच खेळण्याची विनंती करत आहेत.

 

काय म्हणाले रमीज आणि सकलेन?
पाकिस्तानात डोमेस्टिक क्रिकेट सीझन चालु आहे पण मोठे खेळाडू खेळत नाहीयेत.पाकिस्तानचे माझी ओपनर आणि प्रसिद्ध कमेंटेटर रमीज राजान काही दिवसांपुर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले- आमच्या येथे ग्राउंड्सची अवस्था इतकी वाईट आहे की, खेळाडूंचे भविष्य धोक्यात आहे. या मैदानामुळे त्यांना अशी दुखापत होऊ शकते की, त्यांचे करीयर संपून जाईल. त्यामुळे खेळाडूंना येथे खेळायचे नाहीये. ऑफ स्पिनर्स सकलेन मुश्ताकने पण म्हटले की, आमचे मैदान 

तर शाळेतल्या मैदानापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत.

 

काय आहे समस्या?
2009 मध्ये पाकिस्तानात श्रीलंका क्रिकेट टीमवर हल्ला झाला होता. त्यानंतर कोणतीच मोठी इंटरनॅशनल टीम पाकिस्तानात खेळायला गेली नाही. त्यामुळे पीसीबीची कमाई बंद झाली. सरकारची आर्थिक परिस्थितीही व्हंटीलेटरवर आहे, आणि कधी चीन समोर तर कधी आईएमएफ समोर हात पसरावे लागत आहेत. म्हणजे सरकारही कर्जात बुडालेली आहे, त्यामुळे पीसीबीची मदत कशी करावी. भारतासोबतचे भांडणही इतके महागात पडले की, क्रिकेट आणि फिल्म 

इंडस्ट्री नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान सगळ्या सीरीज दुबई आणि यूएईमध्ये खेळत आहे. तिकडून काहीच रेव्हेन्यू मिळणार नाहीये. त्यामुळे पाकिस्तानात क्रिकेटचे वाईट दिवस सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...