Delhi / पीडीपी सदस्यांनी राज्यघटना फाडण्याचा केला प्रयत्न, सभापतींनी मार्शल बोलावून बाहेर काढले

पीडीपी खासदार मीर माेहंमद फय्याज सभागृहाबाहेर विरोध करताना दिसले. पीडीपी खासदार मीर माेहंमद फय्याज सभागृहाबाहेर विरोध करताना दिसले.

काँग्रेसच्या आरोपावर पलटवार; ३७०च्या आडून ३ कुटुंबांनी जम्मू-काश्मीरची लूट केली - शहा
 

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 06,2019 08:33:00 AM IST

नवी दिल्ली - शहा यांनी संकल्पपत्र सादर करताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. पीडीपीच्या २ खासदारांनी सरकारच्या प्रस्तावाला विरोध करत राज्यसभेत राज्यघटनेची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दोन्ही खासदारांना मार्शलकरवी बाहेर काढले. सभागृहाबाहेरही खासदार एम. एम. फय्याज आणि नाझिर अहमद यांनी विरोध सुरूच ठेवला. त्यांनी अंगावरील कपडेही फाडले. याशिवाय माकपचे खासदार टी. के. रंगराजन यांनी हा काळा दिवस असल्याचे नमूद केले. तर द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील जनतेची मते जाणून न घेता कलम ३७० रद्द करणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे सांगितले.

काँग्रेसच्या आरोपावर पलटवार : ३७०च्या आडून ३ कुटुंबांनी जम्मू-काश्मीरची लूट केली : शहा
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मीरमध्ये युद्धासारखी स्थिती का आहे? माजी मुख्यमंत्री नजरकैदेत का आहेत? आपल्या देशाचे शिर असलेले काश्मीर सरकारने कापून वेगळे केले. एखाद्याची नाळ कायद्याने नव्हे, मनाने जोडली जाते. कलम ३७०मुळे काश्मीरचे तीन भाग एकसंध राहिले होते. यावर अमित शहा म्हणाले, कलम ३७० रद्द करण्यास एका सेकंदाचाही विलंब व्हायला नको होता. या ३७० कलमाच्या छायेखाली तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीर राज्याची अक्षरश: लूट केली. यावर विरोधी पक्षनेते आझाद म्हणाले, हा निर्णय जम्मू-काश्मीरला भारताशी कायमचे जोडेल हे पूर्ण सत्य नाही. उलट या निर्णयातून खरे तर तोडण्याचेच काम झाले आहे.

X
पीडीपी खासदार मीर माेहंमद फय्याज सभागृहाबाहेर विरोध करताना दिसले.पीडीपी खासदार मीर माेहंमद फय्याज सभागृहाबाहेर विरोध करताना दिसले.
COMMENT