Home | Jeevan Mantra | Dharm | Sandalwood Increasing Peace and Concentration also Protects Mental Illnesses

शांती आणि एकाग्रता वाढवण्यासोबतच मानसिक आजारांना दूर ठेवते चंदन

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 19, 2019, 12:10 AM IST

चंदनामुळे मेंदूतील हार्मोन बॅलन्स होतात आणि निराशाही दूर होते

 • Sandalwood Increasing Peace and Concentration also Protects Mental Illnesses

  चंदन एक खास प्रकारचे सुगंधित झाड आहे. जसे-जसे हे झाड मोठे होत जाते, त्याप्रमाणे झाडाच्या फांद्या, पाने आणि खोडामध्ये सुगंधित तेलाचा अंश वाढत जातो. धार्मिक दृष्टिकोनातून आपण देवाला चंदन अर्पण करतो यामागे असा अर्थ आहे की, आपले जीवन देवाच्या कृपेने सुगंधित व्हावे तसेच आपली वागणूक शीतल राहावी. चंदनाचा टिळा कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये लावला जातो. काही लोक संपूर्ण कपाळावर चंदनाचा लेप लावतात. हिंदू धर्मामध्ये चंदनाचा टिळा लावणे शुभ मानले जाते. यामागे वैज्ञानिक आणि औषधी महत्त्वसुद्धा आहे.


  डोकेदुखीमध्ये आराम
  वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास चंदनाचा टिळा आपल्या आरोग्यासाठी खूप लाभकारक आहे. हा टिळा कपाळावर नियमिपणे लावल्यास डोके शांत राहते आणि एकाग्रता वाढते. चंदनामुळे विविध मानिसक आजारांपासून रक्षण होते. डोकेदुखीची समस्याही चंदनामुळे दूर होऊ शकते. चंदनामुळे डोक्यात सेरॉटेनिन आणि बीटा एंडोर्फिन स्राव संतुलित प्रकारे होतो. यामुळे उदासी कमी होते.


  केस होतात चमकदार
  चंदनाचा टिळा लावल्याने त्वचा शुद्ध राहते. चंदन लावल्याने मेधाशक्ती वाढते तसेच मानसिक थकवा विकार होत नाहीत. त्वचेवर लाल चंदन लावल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांपासून रक्षण होते. चंदन तुम्ही कंडिशनर स्वरूपातही वापरू शकता. हे केसांना मजबूत करण्यासोबतच केसांची चमकही वाढवते.

Trending