Home | Business | Industries | Pehla Kadam Aand Pehli Udaan SBI Bank Account For Kids

मुलाचा जन्‍म होताच SBI च्‍या या स्‍कीमचा घेऊ शकता फायदा, फक्‍त करावे लागेल हे काम, मिळेल 10 लाखापर्यंतची सुविधा

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 06:01 PM IST

तुम्‍ही तुमच्‍या मुलांसाठी बँकेची स्‍कीम शोधत असाल तर स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे पहिले पाऊल आणि पहिले उडाण अकाऊंट तुमच्‍यासा

 • Pehla Kadam Aand Pehli Udaan SBI Bank Account For Kids

  न्‍यूज डेस्‍क- तुम्‍ही तुमच्‍या मुलांसाठी बँकेची स्‍कीम शोधत असाल तर स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे पहिले पाऊल आणि पहिले उडाण अकाऊंट तुमच्‍यासाठीच आहे. हे दोन्‍ही अकाऊंट विशेषकरून मुलांसाठी तयार केले आहेत. पहिले पाऊल हे अकाऊंट जन्‍मजात बाळापासून ते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्‍या मुलांसाठी आहे. पालकांसोबत त्‍यांचे जॉईंट अकाऊंट असणार आहे. तर पहिले उडाण हे अकाऊंट 10 वर्षे ते 18 वर्षांपर्यंतच्‍या मुलांसाठी आहे. मुलांना या खात्‍यांचा गैरवापर करता येऊ नये म्‍हणून बँकेतर्फे विशेष खबरदारी घेतली जाते.


  अकाऊंटमध्‍ये मिळणा-या सुविधा
  - या दोन्‍ही स्‍कीममध्‍ये मिनिमम बँलेसची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच अकाऊंटमध्‍ये झीरो बॅलेंस असल्‍यावरही कोणतचा चार्ज लागणार नाही.
  - खात्‍यात तुम्‍ही 10 लाखापर्यंतची रक्‍कम जमा करू शकतात. याहून अधिक पैसे खात्‍यात जमा करता येणार नाही.
  - अकाऊंटमधून रोज 5000 रूपये विद्ड्रॉल करू शकतात. यामध्‍ये Bill payment, Opening e-Term Deposit (e-TDR)/ e-Special Term Deposit (e-STDR)/ e-Recurring Deposit (e-RD), Inter-Bank funds transfer (NEFT only) चा वापर करू शकतात.
  - या अकाऊंटमध्‍ये चेकबूकचीही सुविधा दिली जाते. अकाऊंट आपेनिंगवेळी 10 चेक दिले जातात.
  - या अकाऊंटमध्‍ये ATM-cum-Debit Cardचीदेखील सुविधा दिली जाते. या कार्डवरती मुलाचा फोटो असतो. मुलगा आणि पालकांच्‍या नावावर हे कार्ड इश्‍यू होते. या कार्डातून पैसे काढण्‍याची डेली लिमिट 5000 रुपये ऐवढी आहे.
  - या अकांऊटमार्फत मुलगा 2000 रुपयापर्यंचे पेमेंट किंवा टॉप अप करू शकतो.


Trending