खोळंबलेली कामे या मंत्राने तडीस जातील

धर्म डेस्क, उजैन | Update - May 24, 2011, 07:28 PM IST

काम पूर्ण होत आलेले असते आणि अचानक काही विघ्न येतं.

 • pending-work

  अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की एखादे काम पूर्ण होत आलेले असते आणि अचानक काही विघ्न येतं. अशा वेळी मनात एक प्रकारची निराशा दाटून येते. अनेकदा तर आपल्या कामाची सफलता ही अशा लोकांवर अवलंबून असते की ज्यांच्याशी आपलं जुळत नाही. अशा वेळी जर पुढील मंत्राचा जप विधीपूर्वक केला तर आपले कार्य तडीस जाऊ शकते.
  मंत्र
  ओम श्रीं श्रीं ओम ओम श्रीं श्रीं हुं फट् स्वाहा ।
  जप विधी
  सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र नेसून भगवान शिवाची पूजा करा. त्यानंतर एकांतात बसून रुद्राक्ष माळेने या मंत्राचा जप करा. थोड्याच दिवसात या मंत्राचा प्रभाव जाणवू लागेल आणि आपली खोळंबलेली कामे तडीस जातील.

Trending