आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारखे दुकानात घुसायचे दोन पेंग्विन, न्यूझीलंड पोलिसांनी केले अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन(न्यूजीलंड)- येथून पोलिसांनी दोन पेंग्विन्सला एका सुशी(जापानी मिठाई)च्या दुकानात घुसत असल्यामुळे असल्यामुळे अटक केले. पण काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. दुकानदाराने सांगितले की, यामुळे त्याला नाहक त्रास होत होता. अनेकवेळा यांना दुकानातून बाहेर काढले, तरीदेखील ते परत दुकानात यायचे. त्यामुळे मला शेवटी पोलिसांना बोलवावे लागले.


वेलिंग्टन पोलिसांनी शेअर केले प्रकरण
न्यूजीलंडमध्ये पेंग्विन्सकडून दुकानदारांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. असेच एक प्रकरण वेलिंग्टनमधून समोर आले होते. जेव्हा रेल्वे स्टेशनजवळी एक दुकानदार विनी मॉरिसला सोमवारी सकाळी दुकानातून पेंग्विनचा आवाज ऐकू आला. कॉन्स्टेबल जॉन झूला याची माहिती मिळाली, या घटनेला त्यांनी वेलिंग्टन पोलिसांच्या फेसबूक पेजवर पोस्ट केले आहे.

 

पोलिसांनी संरक्षण विभाग आणि वेलिंग्टन जूच्या मदतीने दोन्ही पेंग्विनला वेलिंग्टन हार्बरवर सोडले. येथे 600 पेंग्विनांचे जोडे राहतात. त्यांची देखरेख न्यूजीलंडचा संरक्षण विभाग करते. पण पेंग्विनला अटक झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

 

 

 


पेग्विन मानसांना चावू शकतात, त्यामुळे वेलिंग्टनच्या नागरिकांना पेंग्विनपासून दूर राहण्याची ताकिद दिली आहे. दुकानाची मालकीन विनी मॉरिसने सांगितले की, दे दोन्ही पेंग्विंन खूप घाबरलेले होते. संरक्षण विभागाचे मॅनेजर जॅक मेसने सांगितल्यानुसार, पेंग्विनच्या ब्रीडिंगचा सीजन असल्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात दुकानात जाऊन फर्निचरच्या खाली लपून बसले.