आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Penting Made By 'Majnu Bhai' Seen In Queen Elizabeth's House, Photo Shared By Anil Kapoor

क्वीन एलिजाबेथ यांच्या घरी दिसले 'मजनू भाई' चे पेंटिंग, अनिल कपूर यांनी शेअर केला फोटो  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप ला सुरुवात झाली आहेत. यावेळी वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळले जात आहे. अशात क्वीन ऐलीजाबेथ आणि प्रिंस हॅरी यांनी वर्ल्ड कपमध्ये भाग घेणाऱ्या 11 टीमच्या कॅप्टन्सची भेट घेतली होती. ज्यामध्ये विराट कोहली देखील सामील होता. क्वीनसोबतच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पण यादरम्यान या सर्वांमध्ये पुन्हा एकदा कॅप्टन्स आणि क्वीन ऐलीजाबेथ यांच्या भेटीचा हा फोटो चर्चेत आला आहे. याचे कारण आहे बॉलिवूडचे मजनू भाई म्हणजेच अनिल कपूर. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर फॅन्सच्या खूप वेगवेगळ्या रिऍक्शन्स येत आहेत. फोटोमध्ये क्वीन ऐलिजाबेथ यांच्यासोबत सर्व 11 टीमचे कॅप्टन दिसत आहेत. मात्र हा फोटो व्यवस्थित पहिला तर कळते की, या फोटोमध्ये एक पेटिंग लागलेली दिसत आहे. जी 'वेलकम' चित्रपटातील मजनू भाई यांनी बनवलेल्या पेटिंगसारखी दिसत आहे. अनिल कपूर यांनी हे मिम शेअर करत चेष्टने लिहिले, 'मजनू भाईचे आर्ट खूप दूर आणि खूप मोठ्या जागी पोहोचले आहे.' 

 

2007 मध्ये अनिल कपूर, अक्षय कुमार आणि नाना पाटेकर स्टारर ब्लॉकबास्टर चित्रपट 'वेलकम' ने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले प्रदर्शन केले होते. चित्रपटात अनिल कपूर 'मजनू भाई' च्या भूमिकेत होते. या चित्रपटात मजनू भाईने बनवलेल्या पेटिंगवर नेहमी वेगवेगळे मीम्स बनवले जातात. अशात पुन्हा एकदा कोणत्यातरी फॅनने हे मीम बनवले आहे जे अनिल कपूर यांनी आपल्या ऑफिसियल अकाउंटवरून शेअर केले आहे. 

 

 

अनिल कपूर यांच्या ट्विटवर येत आहेत मजेशीर कमेंट्स...