आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! या देशातील लोक उकळुन पितात महिलांनी वापरलेले सॅनेटरी पॅड; कारण ऐकून व्हाल थक्क...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नशा करण्यासाठी लोक काय-काय नाही करत. नशेत अनेकांनी स्वत:ला उध्वस्त करुन घेतले. माणसाला कसल्या गोष्टींचे व्यसन लागेल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक  प्रकार समोर आला आहे. नशा करण्यासाठी ड्रग्स, दारु, गांजा यांच्या सेवन केले जाते हे तुम्ही ऐकलाच असाल. परंतु, इंडोनेशियातील एका विचित्र नशेबद्दल ऐकल्यावर डोके सुन्न पडेल. या देशात महिलांनी वापरलेले सॅनेटरी पॅड आणि लहान मुलांच्या डायपरला पाण्यात उकळवून येथील लोक त्याचे पाणी पितात. 

 

ही नशा केल्याने होतो हवेत उडण्याचा भास

> येथील लोक सॅनेटरी पॅड आणि डायपरला पाण्यात उकळवून, लिक्विड बनवून त्याची नशा करत आहेत. 13 ते 16 वर्षे वय असलेली मुलेही या नशेच्या आहारी गेले आहेत. एका अहवालानुसार, हे उकळलेले पाणी पिणाऱ्यांवर विचित्र परिणाम होतात. हे लिक्विड पिल्यानंतर मुलांना हवेत उडण्याचा भास होतो.
> एका 14 वर्षाच्या मुलाने स्वत: हे स्विकारले आहे. तो मुलगा या पाण्याला दिवसातून तीन वेळा पितो. मीडिया रिपोर्टनुसार, इंडोनेशियातील जे तरुण पैशांच्या कमतरतेमुळे दारु किंवा सिगारेटची नशा करु शकत नाही. ते कचऱ्यात पडलेल्या सॅनेटरी पॅडला पाण्यात उकळून त्याची नशा करतात.

 

ही नशा ठरू शकते प्राणघातक

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सॅनेटरी पॅडमध्ये सोडियम पॉलीक्राइलेट असते. जे मासिकपाळीवेळी होणाऱ्या रक्तस्त्रावला शोषून घेते. लोकांना याचीच नशा होते. या पॅडला उकळवून जे नशा करतात त्यांच्यासाठी ही नशा प्राणघातक ठरू शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...