आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारविरोधात बोलण्याची लोकांत भीती : राहुल बजाज, अमित शहा म्हणाले - सुधारणा करू, घाबरण्याची गरज नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / मुंबई - देशात सध्या भीतीचे वातावरण आहे. लोक सरकारवर टीका करण्यास घाबरत आहेत कारण आपल्या टीकेकडे सरकार कशा पद्धतीने पाहील याबद्दल लोकांमध्ये विश्वास नाही, असे वक्तव्य उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर केले. त्यांनी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईत एका कार्यक्रमात शनिवारी बजाज यांनी हे वक्तव्य केले. बजाज यांंच्या वक्तव्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खंडन केले. ते म्हणाले की, सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत आहे. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याबाबत शहा म्हणाले की, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी याआधीच प्रज्ञा यांच्या वक्तव्यावर टीका केली असून पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. दुसरीकडे बजाज यांच्या या वक्तव्यावर राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा म्हणाले की, कोणीतरी बोलतोय याचा आम्हाला आनंद होत आहे. देशाला सध्या उद्योगपती राहुल बजाज यांच्यासारख्या लोकांची गरज आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यावर भाजपने पलटवार केला आहे. भाजपने म्हटले आहे की, बजाज हे विरोधी पक्षांपासून प्रभावित आहेत. विरोधी पक्ष एक मोहीम सरकारच्या विरोधात चालवत होता, बहुधा ते त्यामुळे प्रभावित आहेत किंवा त्यांच्यासोबत मिळून असे वक्तव्य देत आहेत. बजाज यांचे वक्तव्य सोशल मीडियातही ट्रेंड होत होते.

बातम्या आणखी आहेत...